आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय वातावरण चांगलच तापल आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकिय नेते दौरे करताना दिसत आहेत. आमदार आदित्य ठाकरे देखील दौऱ्यासाठी गेले होते. त्यांचा दौरा संभाजी नगर मध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र भाजपने त्यांना दौऱ्यासाठी विरोध दर्शवला.
छत्रपती संभाजी नगरमध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. यालाच अनुसरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. हे जे झेंडे घेऊन फिरत आहेत ना हे भाजपचे पेड वर्कर आहेत, असा आरोप त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर केला.
भाजप सरकारला काही काम नाही. त्यामुळे ते या सर्व गोष्टी करत आहेत. भाजपचे सरकार आल्यापासून गुन्हेगारी वाढली आहे. महिलांवरील अत्याचारांमध्ये तसेच लहान लहान मुलींवर देखील लैंगिक अत्याचार होत होते मात्र याचे प्रमाण वाढले आहे. त्यांना याबाबत काही विचारले तर ते काहीही खोटी कारणे सांगतात. हे भाजपचे कार्यकर्ते नाहीत तर नोकर आहेत, अशी टीका त्यांनी केली.
महाविकास आघाडीबद्दल भाजपाचे लोक काही भूमिका घेतायत त्या भूमिका चुकीच्या आणि खोटारड्या असल्याचा दावा त्यांनी केला. एवढंच नाही तर भाजप सरकारमध्ये असे दोन मंत्री आहेत ज्यांच्यावर असे आरोप केले होते. त्यांचा राजीनामा देखील उध्दव ठाकरेंनी घेतला. मात्र ते आता भाजपमध्ये जाऊन बसले आहेत. फडणवीसांना सांगा की त्यांना आधी बाहेर काढा आणि त्यांच्याकडून राजीनामा घ्या. नंतरच “नैतिकतेच्या ढोंगी गप्पा मारा” अशी खोचक टीका राऊतांनी केली.
संजय राऊत यांना ठाकरे गटाविषयी होणाऱ्या आरोपांबद्दल प्रश्न विचारले. तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगीतले की, आम्हाला या टीकांचा आणि आरोपांचा काहीच फरक पडत नाही. ठाकरे कुटुंबाला लोक खूप मानतात. त्यांच्याकडे लोकांचा पाठिंबा आहे. लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात. त्यांना सपोर्ट कर