Posted in

‘आमच्या पक्षात कोणालाही मुख्यमंत्री पदामध्ये इंटरेस्ट नाही’.. शरद पवारांचे मोठे वक्तव्य

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार जाहीर करावा अशी मागणी केली आहे. काँग्रेसने त्यांच्या पक्षातील कोणताही उमेदवार जाहीर करावा नाहीतर शरद पवार गटातील कोणत्याही व्यक्तीला उमेदवारी द्यावी, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ अशी मागणी उध्दव ठाकरे यांनी केली. शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरेंच्या मागणीवरून त्यांचे मत व्यक्त केले.

कोणता उमेदवार मुख्यमंत्री पदासाठी निवडणार आहे याची उत्तरे दिली. तेंव्हा त्यांनी स्पष्ट सांगीतले कि, आम्हीं फक्त आमच्या पक्षाबद्दल बोलतो बाकीच्यांच आम्हाला माहीत नाही. आमच्या पक्षात कोणत्याही व्यक्तीला मुख्यमंत्रीपदात इंटरेस्ट नाही. आम्हाला फक्त सत्तेत बदल घडवायचे आहेत. सर्व जनतेला एक आदर्श शासन द्यायचे हेच आमचं लक्ष्य आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

मीडिया सोबत संवाद साधत असताना त्यांना काही प्रश्न विचारले गेले. त्यामधे त्यांना विचारण्यात आले की तुमची महाविकास आघाडीमध्ये जाण्याची इच्छा आहे का? तुम्ही आमदारांना भेटता तर त्यांच्यासोबत काय चर्चा करता? त्यावर शरद पवारांनी सांगितले की, आम्हाला भेटतात खूप लोक ते आमच्याशी चर्चा देखील करतात मात्र यावर अजुन काही निर्णय घेतला नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा विचार करू.

आम्ही कागलला जाणार आहे. तेथील लोकांनी आम्हाला एक सभा घेण्याचा आग्रह केला आहे त्यांच्या आग्रहाला मान देण्यासाठी ३ तारखेला आम्ही तिकडे जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी त्यांच्या सुरक्षेसंबंधी माहिती दिली. केंद्र सरकारने माझ्या सुरक्षेत आणखी तीन लोक वाढवले आहे. मला कोणी धमकी दिली आहे का? असे मी त्यांना विचारले मात्र आधिकाऱ्याना याबद्द्ल काहीचं माहीत नाही.