विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आल्याने आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून भाजप मोठे षडयंत्र रचत असल्याची चर्चा होत आहे. गेल्या निवडणूकीत भाजपला म्हणावे असे यश मिळाले नाही. त्यांनी या निवडणूकी संदर्भात काही बदल घडवायचे ठरवले आहे. यावेळी भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष पद ओबीसी नाहीतर महिलेला द्यायचे अशी शक्यता दर्शवली आहे.
भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकारी, संघटन मंत्री यांची शनिवारी बैठक होणार आहे. चारही राज्यातील निवडणूक जिंकण्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा करून निवडणूकीची पूर्व तयारी करणार आहेत. या बैठकीला केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह तसेच अमित शहा देखिल सहभागी होतील. तसेच नरेंद्र मोदी देखील उपस्थितीत असतील, असे वृत्त आले आहे.
या बैठकीत अध्यक्ष पद कोणाला द्यायचे यावर चर्चा होणार नाही अशी माहिती समोर आली आहे. मात्र केंद्र सरकार अध्यक्ष पदाबद्दल काही घोषणा करु शकते. या बैठकीत मुख्य चर्चा ही संघटनात्मक धोरणांवर होईल. राजकिय मुद्यांवर तसेच राजकीय घडामोडींवर चर्चा करुन योजना आखल्या जाऊ शकतात.
भाजप यावेळी अध्यक्ष पदासाठी तळागाळाशी नाळ जोडली असेल असे नेते शोधत आहे. याचा फायदा भाजपला निवडणुकीला होईल. भाजप ओबीसी नाहीतर महिलेला पद देईल. मात्र भाजपने अजून कोणलाही हे पद दिले नाही. अजून यावर काही माहिती समोर आली नाही.