Posted in

‘ मग तर यांची नैया डुबली म्हणून समजा’; संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंना जोरदार टोला….

राज्यात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाच्या चर्चांनाही वेग आला आहे. उद्धव ठाकरे हे तीन दिवस दिल्ली ला गेले होते. यावेळी त्यांनी सोनिया गांधी , राहूल गांधी, तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. यावरुनच आता उद्धव ठाकरे यांच्याच खांद्यावर महाविकास आघाडीची धुरा असल्याची चर्चा रंगत आहे. यावरूनच शिंदे सेनेतील नेते संजय शिरसाट यांनी हल्लाबोल केला आहे.

सरकारने ज्या घोषणा केल्या त्या परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. महिला – भगिनीच्या अकाउंट मध्ये जेव्हा 3 हजार रुपये जातात तो आनंद सर्वसामान्य कुटुंबांनाच माहित आहे. म्हणून आज त्याच्याघरात दिवाळी आहे. तुमच्या माझ्या सारख्याना तीन हजारांच महत्व कळणार नाही. एकनाथ शिंदे साहेबांचे वैशिष्ट्य आहे ते जे बोलतात ते करतात. काही लोकांनी टीका करण्याचा प्रयत्न केला. काही लोकांचा पोटसूळ उठलं याच्याने काय होतं, त्याच्याने काय होतं.आज महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणी शिंदे साहेबांना मन भरून आशीर्वाद दिले असतील. आमचा पाठीराखा, आमचा भाऊ आमच्या पाठीशी उभा आहे, हे म्हणणाऱ्या लाखो बहिणी असा दिवस आनंदाने साजरा करतात असं ते यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याच खांद्यावर महाविकास आघाडीची धुरा असल्याची चर्चा रंगत असून यावर बोलताना , मग तर यांचे नैया डुबली म्हणून समजा अस म्हणत जोरदार टोला लगावलेला आहे. डिव्हिजन वाईज चार सभा होतील आणि प्रचार संपेल. काँग्रेस आणि शरद पवार धुरा वगैरे देणार नाहीत परंतु जबाबदारी घेण्याची सुद्धा यांची मानसिकता नाही. खऱ्या अर्थाने लोकांना प्रश्न पडतोय पक्षप्रमुख कोण उद्धव ठाकरे साहेब आहेत की संजय राऊत आहेत, अश्या शब्दांत त्यांनी टीका केली आहे