विधानसभा निवडणूक काही महिन्यानावर येऊन ठेपल्या आहेत. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाहिजे तसे यश मिळाले नाही त्यामुळे यावेळी त्यांनी कंबर कसली आहे. मात्र महाविकास आघाडीने चांगल्या पद्तीने कामगिरी केली होती. याचा फायदा मविआ या निवणुकीसाठी घेणार असून त्यांनी नेत्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.
निडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नेते दौरे करत आहेत. शिवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे वरळीचे आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी जोमाने तयारी सुरू केली आहे. मात्र त्यांनी मागील निवडणुकित वरळीकडे फारसे लक्ष दिले नाही, असा आरोप त्यांच्यावर केला आहे आहे. वरळीकरांनी त्यांना पत्रात ठणकावून विचारले की, तुम्हाला जय महाराष्ट्र म्हणायचं की सलाम वालेकुम?
‘तुम्हाला जय महाराष्ट्र साहेब बोलायचे की सलाम वालेकुम मिया असं बोलायचं असा प्रश्न आम्हाला पडलाय’ अशी टिका करत पत्राची सुरुवात केली. ‘ आम्ही वेडे आहोत म्हणून आतापर्यंत तुमच्या शिवसेनेला मतदान करत राहिलो… हा बाळासाहेबांचा वारस वरळी मतदारसंघ पिंजून काढून सर्वांसमोर आदर्श निर्माण करेल असं वाटलं होतं… पण असं काही झालं नाही. तुम्ही निवडून आल्यावर वरळी विधानसभेकडे थोबाड फिरवलं ते आता निवडणुका आल्यानंतरच दाखवलं ‘असे आरोप त्यांच्यावर केले.
‘चार वर्ष तुम्ही आम्हाला लाथाडलं तरी देखील तुम्ही आता येता, तरी आम्ही तुमचं वरळीच्या गल्लीत स्वागतच करतोय. आम्ही रडत असताना डोळे पुसायला तुम्ही नाही आलात तरीदेखील आम्ही तुमचं स्वागत केलं, याला येडेपणा नाही बोलायचं तर काय? साहेब बास झालं आता जाम झाला वेडेपणा! साहेब पाच वर्ष गायब राहून आता किती पण थोबाड दाखवला तरी शहाणा झालेला वरळीकर तुमच्यावर विश्वास ठेवण्याचा वेडेपणा करणार नाही’ असं म्हणत शहाणा झालेला वरळीकर तुमच्यावर पुन्हा विश्वास ठेवण्याचे वेडेपणा करणार नाही असे बोलून पत्राचा शेवट केला.