Posted in

ठाकरे गटाच्या नेत्याची नितेश राणेंवर खालच्या भाषेत टीका; म्हणाले…

आपल्या बेधडक वक्तव्यामुळे कणकवलीचे भाजपा आमदार नितेश राणे कायम चर्चेत असतात. ठाकरे गटावर नेहमीच नितेश राणे खरमरीत टीका करत असतात. मात्र सध्या ठाकरे गटाच्या नेत्यानी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ठाकरे गटाचे शरद कोळी यांनी भाजपचे नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

नितेश राणे हे भाजपचं पाळलेल गटारीतील डुक्कर आहे अशा शब्दांत त्यांच्यावर जोरदार टिका केली आहे. “भाजपने नितेश राणे या डुकराला राज्यात कमळ फुलवण्यासाठी सोडलं होतं. मात्र त्याने या राज्यात चिखल करून ठेवला. नेपाळी औलाद 2-3 महिने थांब, तुला बोऱ्या बिस्तर बांधून नेपाळला पाठवल्याशिवाय राहणार नाही” असेही त्यांनी म्हटले.

त्याचबरोबर पुढे बोलताना शरद कोळी म्हणाले, “भाजपने तुम्हाला लोकसभेच्या प्रचारात कुठे घेतलं नाही. कारण तुम्ही गटारीतले डुक्कर आहात. नितेश राणेंसह बापाला आणि भावाला महाराष्ट्र भाजपने लोकसभा प्रचारात कुठेही घेतले नाही. अशी खालच्या पातळीची भाषा शरद कोळी यांनी वापरली. सध्या त्यांचे वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे.