सध्या आगामी विधानसभा निवडणुकीची चर्चा आपल्याला सगळीकडे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांनी दौरे सुरु केले आहे. जनसामान्य लोकांमध्ये जाऊन नेते सभा घेत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित नसणारा पराभव मिळाला होता त्यामुळे विधासभा निवडणुकीसाठी महायुतीने कंबर कसली आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीने लोकसभेत दणदणीत विजय मिळालवला त्यामुळे त्यांनीही जोमाने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
महाविकास आघाडीसमोर त्यांच्या पक्षातील पदाधिकारी अडचणी निर्माण करणार की काय? अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. दरम्यान आता याबाबत सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी आली आहे. मुस्लिम समाजाला विधानसभेची उमेदवारी द्या, नाहीतर जिल्ह्यातील विधानसभेच्या 11 जागा पाडणार असल्याचा इशारा सोलापूर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने दिला आहे.
सोलापूर मध्ये ११जागा आहेत. त्यामध्ये चार जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. राहिलेल्या जागांपैकी चार जागा काँग्रेस पक्ष तर तीन शिवसेना उद्धव ठाकरे गटाला देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. काँग्रेसचे पदाधिकारी शौकत पठाण यांनी मुस्लीम समाजातील एका नेत्याला एक जागा द्यावी अशी मागणी केली आहे. त्यांनी असही म्हटले की, ती जागा नाही मिळाली तर आम्ही बाकी सगळ्या जागा पाडू. सध्या त्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे,
त्यामुळे आता सोलापूरच्या राजकारणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्ह्यात कोण किती जागा लढवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच कोणता उमेदवार कोणत्या पक्षाकडून निवणुक लढणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.