अगोदर निवडणुका जाहीर होऊ द्या; आघाडी, युती बद्दल मी व्यवस्थित सांगतो – अजित पवार

0

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी अशा तीन पक्षाने एकत्रित येत महाराष्ट्रात नवीन प्रयोग करत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. मात्र आता राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याचे सर्वानाच स्वप्न पडू लागले आहेत असे म्हणायला हरकत नाही. काँग्रेस नेते तथा महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर काँग्रेस महाराष्ट्रात निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे; आज याला भाई जगताप यांनी सुद्धा पुष्टी दिली आहे.

पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत निवडणुकांमध्ये आघाडीबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना अजितदादा पवार बोलत होते. त्यांना या बद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की “अगोदर निवडणुका जाहीर होऊ द्या मी व्यवस्थित सांगतो, निवडणुकांपूर्वी आघाडी युती याच्या चर्चांना काहीच महत्त्व नाही”. सध्या आम्ही सर्वजण व्यवस्थित सरकार चालवत असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच अजित दादा पवार म्हणाले की आत्ता प्रत्येक जण आपला पक्ष वाढण्याचा प्रयत्न करतच असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच त्यांनी शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.