१२ कोटी लसी एक रक्कमी, एका चेकने घेण्याची तयारी आहे!

0

१ मे म्हणजेच आज महाराष्ट्र दिनापासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी ही केंद्र शासनाने राज्य शासनावर टाकली आहे. महाराष्ट्रामधील ६ कोटी नागरिक या वयोगटातील आहे. त्यांच्यासाठी तब्बल १२ कोटी लसींची आवश्यकता आहे.

आपण “एक रक्कमी… एका चेकने १२ कोटी लस घेण्याची महाराष्ट्राची ताकद आहे”. अशा शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करताना सांगितले. कोरोना मुळे आपण आर्थिक अडचणीत मधून जात आहोत. मात्र नागरिकांचा जीव अधिक महत्वाचा आहे. आपण लवकरच या परिस्थितीवर मात करू असा विश्वास त्यांनी संवाद साधत असताना व्यक्त केला. महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधत असताना त्यांनी याच सोबत राज्यातील निर्बंध, तसेच भविष्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्या संदर्भात सुध्दा महाराष्ट्र तयारी करत आहे.

काही लोकांचा समज आहे की केंद्र सरकार आपल्याला लस ही मोफत देणार आहे. मात्र या बाबतीत त्यांनी अधिकची माहिती घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. व आज जर आपल्याला १२ कोटी डोस कुणी देणार असेल तर ती रक्कम एकरकमी देऊन ते डोस घेण्याची आपली तयारी आहे. मात्र या लसीच्या बाबतीत काही केंद्राच्या मर्यादा आहेत. आपले सिरम आणि भारत बायोटेक सोबत चर्चा सुरू आहे. अशी माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.