बारा भावी आमदारांच्या नावांची यादी गहाळ : शिवसेनेची राजभवनाविरोधात तक्रार!

0

विधान परिषदेच्या राज्यपाल कोट्यातून नेमावयाच्या असलेल्या भावी आमदारां च्या नावांची यादी राज्य सरकारकडून पाठविण्यात आली होती. मात्र या यादीच्या बाबतीत माहिती अधिकार अंतर्गत माहिती विचारली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राज्यपालांकडे दिलेल्या या यादीच्या बाबतीत माहितीच्या अधिकारात माहिती मागवली असता ही यादी आमच्याकडे नसल्याचे राज्यपाल सचिवालयाने माहिती अधिकारात कळवले होते. यावरून चांगलच राजकारण पेटले आहे.

या यादी मध्ये एकनाथ खडसे, राजू शेट्टी, उर्मिला मातोंडकर आदींची नाव या यादीत असल्याने राज्यपाल या नावांना केव्हा मंजुरी देतात, याची उत्सुकात राज्याच्या राजकीय वर्तुळात आहे मात्र आता यादीच गहाळ झाली असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ही यादी भूताने पळवली की वादळात वाहून गेली, अशी टीका सामना या वृत्तपत्रातून शिवसेनेनं केली होती. आता पुणे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तसेच ही यादी गहाळ केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेचे पदाधिकारी संजय मोरे ( पुणे शहरप्रमुख), गजानन थरकुडे (शहरप्रमुख), आनंद दवे (शहर समन्वयक), लक्ष्मण घुले (अॅडव्होकेट) आदींनी ही तक्रार पुणे पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.