सांगलीतील बेडग गावात १००टक्के लॉकडाऊन,रुग्णसंख्या वाढल्याने ग्रामस्थांचा निर्णय

0

कोल्हापूर व सांगली हे एकमेकांना जवळ असणारे जिल्हे आहेत.कोल्हापूर जिल्ह्यातील १२३ गाव कोरोनामुक्त असून गावात एकही कोरोना रुग्ण सापडलेला नाही आहे.सांगली जिल्ह्यात मात्र सर्वच गावात कमीअधिक प्रमाणात रुग्ण सापडून येत असून गावात स्थानिक पातळीवर निर्णय घेत काही ठिकाणी निर्बंध लावण्यात आले आहेत.

सांगली जिल्ह्यातील बेडग हे गाव १००टक्के बंद करण्याचा निर्णय तहसिलदारांच्या उपस्थितीत सरपंच,सदस्य यांनी घेतला असून त्याला ग्रामस्थांनी साथ देण्याच ठरवल आहे.गावात कोरोना रुग्णांची १०० पार होत असल्याने ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे.गावात ११ दिवस प्रवेशबंदी लागू झाली आहे.उर्वरित लोकसंख्येत कोरोनाची साथ पसरू नये यासाठी ही खबरदारी घेतल्याच ग्रामस्थांच म्हणण आहे.

गावात ११दिवस फक्त अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ सुरू राहतील त्यात दूध संकलन,दवाखाना आणि किराणा यांचा समावेश आहे.इतर सर्वच काम बंद राहणार असून ग्रामस्थांनी घरात बसत कोरोनाची साखळी तोडण्याचा निर्णय घेतला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.