
उच्चस्तरीय चर्चा करण्यासाठी त्या काळी या नेत्याने उंचीवर फोन ठेवला होता!
राजकारण म्हणजे सगळ्यांचा आवडता विषय. जितके राजकारण हे मजेदार आहे तितकेच राजकारणातील किस्से सुद्धा मजेदार आहेत. असाच एक किस्सा धुळे आणि एरंडोल लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे काँग्रेस पक्षाचे खासदार “विजय नवल पाटील” यांच्या बद्दल. त्यांना एक लोकप्रिय नेता ओळखले जाते. त्यांच्या बद्दल असाच एक किस्सा अशोक जैन यांनी सांगितलेला किस्सा खूपच धमाल असा आहे.
“ दिल्ली मध्ये अनेक मराठी नेत्यांच्या सोबत भेटी गाठी होत असत. मात्र या सगळ्या भेटी गाठी मध्ये अविस्मरणीय अशी भेट राहिली ती विजय नवल पाटील यांची असे अशोक जैन सांगतात. एखाद्या गोष्टीला सरळ मार्ग असला तरीही आड रस्ता करून जाण्याची पद्धत ही या पुढाऱ्याची. त्यांना असेच एकदा कामाच्या निमित्त अशोक जैन भेटायला गेले.
त्यांच्या गप्पा गोष्टी झाल्या सहज त्यांची नजर गोदरेज च्या कपाटावर गेली तर त्यावर फोन ठेवलेला. कुतूहल म्हणून त्यांनी सरळ विजय नवल पाटील यांना विचारले की इतक्या वरती फोन का ठेवला आहे ? त्यावर त्यांनी उत्तर दिले की “मी उच्चस्तरीय चर्चा करण्यासाठी फोन उंचावर ठेवलाय.आता यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच मला सुचेना अशी आठवण अशोक जैन सांगतात”!