
रोहित पवारांचा महाराष्ट्रातील रुग्णालयांना मदतीचा हात, केली ही मोठी मदत !
बारामती ॲग्रो च्या माध्यमातून वेळोवेळी राज्यातील परिस्थिती लक्षात घेत सहकार्य करण्यात आलेले आहे. मागील वर्षी सुद्धा कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत राज्यभरात सॅनिटायझर बारामती ॲग्रो च्या माध्यमातून रोहित पवार यांनी दिले होते. आमदार रोहित पवार वेळोवेळी सहकार्य करत असतात.या वर्षीसुद्धा मदतीचा हात म्हणून आमदार रोहित पवार यांनी राज्यातील ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर देण्याचा निर्णय घेतला आहे.
“कोरोनाच्या पहिल्या लाटेत ‘बारामती ऍग्रो’च्यावतीने राज्यभर सॅनिटायझर दिलं होतं. त्याप्रमाणे आज ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन खारीचा वाटा म्हणून राज्यातील हॉस्पिटलसाठी ५०० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेबांकडं देण्यात आले. लवकरच त्यांचं विभागवार वाटप केलं जाईल”. असे फेसबुक पोस्ट मधून त्यांनी सांगितले आहे.
राजकारणा बरोबर सामाजिक क्षेत्रात सुद्धा आमदार रोहित पवार तितक्याच चांगल्या प्रकारे सक्रिय असतात. वेळोवेळी त्यांनी मदतीचा हात देऊन ही गोष्ट सिद्ध केली आहे. देशातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी ही मदत केल्याचे दिसून येत आहे.