मोदींचा जुना व्हिडीओ व्हायरल; “नेतृत्व दिशाहीन असेल तर संकट अधिक गडद होतं”!

0

भारतातील परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. प्रत्येक दिवशी तीन ते साडे तीन लाखापेक्षा जास्त जास्त रुग्ण संख्या आढळून येते आहे. ऑक्सिजन, बेड, इंजेक्शन ची भासणारी कमतरता ही गंभीर समस्या आहे. जगभरातून नरेंद्र मोदी यांच्या निष्काळजीपणा वरती टीका होताना दिसून येत आहे.

अशाच परिस्थिती मध्ये नरेंद्र मोदींचा जुना व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे. त्यांनी या व्हिडिओ मध्ये केंद्र सरकार वर टीका केलेली आहे. त्या वेळी नरेंद्र मोदी गुजरात चे मुख्यमंत्री होते तर केंद्रात सत्तेत असणाऱ्या काँग्रेस सरकारवर त्यांनी टीका केली होती. पाहू या व्हिडिओ मध्ये नेमकं काय म्हणाले आहेत नरेंद्र मोदी

“संकटं येत राहतात. मात्र एखाद्या संकटाच्या वेळी नेतृत्व दिशाहीन, असहाय्य आणि निराश असेल तर ते संकट अधिक गडद होतं. सव्वाशे कोटी लोकांचा देश आज निराशेच्या गर्तेत अडकला आहे. दिल्लीतून देशावर राज्य करणाऱ्यांबद्दल आशा निर्माण होईल, विश्वास निर्माण होईल, हरवलेला विश्वास पुन्हा ठेवता येईल असा कोणाताही विचार अथवा कृती दिल्लीतील राज्यकर्त्यांकडून केली जात नाहीय. पुढील वाटचालीसाठीच्या उपाययोजनाही दिल्लीने केल्या नसल्याचं दिसून येत आहे. देशाचे दुर्देव आहे की देश चालवणाऱ्यांना देशाच्या संरक्षणाची चिंता नाहीय आणि देशाच्या घसरणाऱ्या चलनाचीही चिंता नाहीय”. अशा आशयाचा संवाद त्या व्हिडिओ मध्ये आहे.

हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील माजी खासदार अखिलेश सिंह यांनी ट्विटर वरती हा व्हिडिओ शेअर केला होता. सध्या या व्हिडिओ ची चांगलीच लोकांत चर्चा आहे.

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.