
त्याने मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडून चिलीम ओढायला काड्याची पेटी मागितली, आणि…
वसंतराव नाईक यांच्या साधेपणाचे शेतकऱ्यांशी आपुलकीचे संबंध होते. त्यांचा प्रवास हा अगोदर शेतकरी आणि नंतर मुख्यमंत्री असा राहिलेला आहे त्यामुळे त्यांना कायम स्वरुपी शेतकऱ्यांचा बद्दल अस्था राहत होती. मनात त्यांच्या आपुलकी असे हे सर्वश्रुत आहे.
१९७५ च्या सार्वत्रिक निवडणुका मधील हा किस्सा प्रा. डॉ. गोविंद देशपांडे यांनी सांगितलेला आहे.
” पुसद मतदार संघाचे उमेदवार म्हणून नाईक साहेब निवडणूक लढवत होते. प्रचारार्थ त्यांची गाव गाव जीप गाडी मधून भेटी गाठी, सभा असे दौरे होत असत. निवडणुकांचा काळ म्हणजे वादळी काळ समजला जातो. अशाच घाई गरबडीच्या वेळी वसंतराव नाईक गाडीतून जात असताना त्यांना एका रस्त्यावर शेताच्या बांधावर उभ्या राहिलेल्या शेतकऱ्याने सरळ मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या ताफ्याला हात केला. नाईक साहेब यांनी ड्राइव्हर ला गाडी थांबवायला सांगितली. तशी शेतकऱ्याने त्यांना काड्याच्या पेटीची मागणी केली; साहेबांनी विचारले कशाला ? तर त्याने सांगितले की चिलीम पेटायची आहे तेंव्हा हवी होती. साहेबांनी त्याला काडेची पेटी दिली आणि सोबतच इतर गोष्टींच्या बाबतीत चर्चा सुद्धा केली”!