छत्रपती संभाजी महाराज, पवार, ठाकरे यांची सोशल मीडियावर बदनामी; १३ जणांवर गुन्हा दाखल!

0

सोशल मीडियावर राजकीय द्वेष मनात ठेवून खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. देशातील महापुरुष, नेते यांच्यावर अशाच प्रकारची टीका करणाऱ्या लोकांवर पुण्यात कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना नेत्यांनी पुण्यातील सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. या संबंधीची माहिती पुणे शहरातील शिवसेना उपशहरप्रमुख किरळ साळी यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

४ मे आणि त्या अगोदरपासून राजकारण महाराष्ट्राचे नावाच्या फेसबुक, इंटलेक्युअल फोरम या व्हॉट्सअप ग्रुपवर, कोमट बॉइज अ‍ॅण्ड गर्ल्स फेसबुक ग्रुप आणि सीएम देवेंद्र फडणवीस फॅन क्लब या फेसबुक पेज आणि ट्विटरसारख्या सामाजमाध्यमांवर छत्रपती संभाजी राजे यांच्या सारख्या महापुरुषावर व शरद पवार, उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यासारख्या राज्यातील महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तींच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल, चारित्र्यहनन होईल अशा पद्धतीच्या पोस्ट करण्यात आल्या आहेत. तसेच अश्लील भाषेत मजकूर वापरून काही पोस्ट मोर्फ करत जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या हेतूने प्रेरित होऊन पोस्ट केल्या आहेत. तसेच स्वरूप भोसले नावाच्या व्यक्तीने राष्ट्रपुरुषांच्या नावाने बदनामीकारक पोस्ट केल्याचे तक्रारी मध्ये म्हटले आहे.

छत्रपती संभाजी राजे, पवार, आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून अश्लील शब्द वापरुन बदनामी करणाऱ्यां लोकांवर सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठातील युवासेना उपाध्यक्ष आकाश शिंदे यांनी या प्रकरणामध्ये तक्रार नोंदवली आहे. संबंधित १३ लोकांवर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सायबर पोलीसचे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके करत आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.