व्हिटॅमिन ‘बी’ च्या कमतरतेने हाता, पायाला येतात मुंग्या

0

बराचवेळ एकाच स्थितीत बसल्यास किंवा उभे राहिल्यास हात, पाय बधिर होतात. हाता, पायाला मुंग्या येतात. परंतु काहीवेळा करता असलेल्या या स्थितीतून हात, पाय झटकल्यास लगेचच बाहेर येता येते. परंतु वारंवार जर हाता, पायाला मुंग्या येत असतील तर या बाबीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण तुमची शरीरक्षमता कमी झाल्याचे ते लक्षण असू शकते. तसेच ही लक्षणे एखादा आजार सूचित करत असतात. प्रामुख्याने ही लक्षणे विटामिन बी 12 ची कमतरता असल्यास जाणवतात. मित्रांनो चला जाणून घेऊ विटामिन बी12 चे कार्य

शरीरात हिमोग्लोबीनची कमतरता असल्यास लोहाच्या गोळ्या घेतल्या जातात. परंतु याचे रुपांतर रक्तात करण्याचे काम बी 12 करत असते. ज्या व्यक्तींना मधुमेह किंवा थॉयराईड असतो या रुग्णांना बी 12 च्या कमतरतेमुळे रक्तपुरवठा होत नाही व शरीर लवकर थकते. हा थकवा सतत जाणवतो. या सर्व समस्या वैद्यकीय सल्ल्याने दूर होऊ शकतात. कॅल्शिअमच्या गोळ्या घेतल्याने हा त्रास कमी होऊ शकतो. विटामिन बी 12 चे समृध्द स्रोत असणारे घटक आपण पाहुया.


१) दूध आणि दुधाचे पदार्थ खाल्ल्यास विटामिन बी 12 वाढते व शरीर तंदुरुस्त होते.
२) तुम्हाला मधुमेह असेल तर शरीरातील साखर नियंत्रित ठेवणे हा एकच पर्याय तुमच्याकडे असून त्यासाठी तुम्ही व्यायाम करू शकता.
३) पानाला लावण्याचा चुना किंचित घेत सलग ४ ते ५ दिवस ताकासोबत किंवा पाण्यातून खा. असे केल्याने विटामिन बी 12 मिळू शकते.
वरील उपाय केल्याने शरीरातील विटामिन बी 12 वाढते व शरीरातील रक्त वाढून थकवा दूर होतो. तसेच हाता, पायात मुंग्या येण्याची समस्या दूर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.