
गृहमंत्र्यांनी स्वतःहून जवान राहत असलेल्या घरांची केली पाहणी!
महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
यावेळी त्यांनी अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त धानोरा तालुक्यातील कटेझरी येथील अतिसंवेदनशील पोलीस मदत केंद्राला भेट दिली. जवानांचे मनोबल वाढावे या हेतूने गृहमंत्री यांनी जवानांशी संवाद साधला. त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली सोबतच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची सुद्धा माहिती घेतली.
“जवानांनी गृहमंत्र्यांशी संवाद साधला. तसेच चांगल्या घरांची मागणी केली. गृहमंत्र्यांनी स्वतःहून जवान राहत असलेल्या घरांची पाहणी करुन त्यांच्या कुटुंबियांची विचारपुस केली. चांगल्या घरांच्या मागणीबाबत लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन गृहमंत्र्यांनी यावेळी दिले”.
अशा आशयाचे ट्विट करून महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या अधिकृत हॅण्डल वरून माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री खूप चांगल्या प्रकारे कामगिरी करत आहेत तसेच जवानांचे मनोबल वाढविण्याचे काम करत आहेत ही निश्चित कौतुकास्पद बाब आहे.