सचिन वाझे प्रकरणी अजित पवारांनी व्यक्त केली प्रतिक्रिया

0

मुंबई : मुंबईत गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना ‘एनआयए’ कडून अटक करण्यात आल्यानंतर राजकीय क्षेत्रात निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटत असून यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. आता या प्रकरणावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

‘सचिन वाझे प्रकरणी दोषी असतील, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. त्यात कोणालाही पाठिशी घालण्याचे काम महाविकासआघाडी सरकार करणार नाही तसे करण्याचे काही कारण नाही.’ असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान या प्रकरणात ‘एनआयए’ने मोठी कारवाई करत सचिन वाझे यांना अटक केली यानंतर विशेष न्यायालयाने वाझेना आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सध्या वाझे ‘एनआयए’च्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी करण्यात येते आहे. मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांच्यातील संबंधांचा शोध ‘एनआयए’कडून लावण्यात येतो आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.