शरद पवार गृहमंत्री अनिल देशमुखांवर नाराज, परिणामी अनिल देशमुखांनी घेतली शरद पवारांची भेट

0

दिल्ली : सध्या विधानसभा आणि संपूर्ण राज्यात गाजत असणारे मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरण, अनिल देशमुखांना भारी पडले आहे असे दिसत असून, शरद पवार त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. शरद पवार यांचं नेहमीच पक्षाच्या सर्वच नेत्यांकडे लक्ष असतं. इतकच काय पवार साहेबांच्या लक्षात त्यांचे कार्यकर्ते नावानिशी असतात. सर्वसामान्य कार्यकर्ता ते नेता, अशी संधी अनेकांनी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळवली आहे.

 

 

याबाबतचं ठळक उदाहरण म्हणजे, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री कै.आर.आर.आबा पाटील होय. सध्याही अनिल देशमुख गृहमंत्री पद सांभाळत आहेत. पवार साहेब मात्र त्यांच्यावर नाराज आहेत. नेमकी काय कारण आहेत पवार साहेब नाराज होण्याची?

25 फेब्रुवारीला प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईस्थित निवासस्थानाबाहेर, जिलेटीनच्या कांड्या एका गाडीत सापडण्याचं प्रकरणाने या घटनाक्रमाला सुरुवात झाली. या गाडीचे मालक असणारे मनसुख हिरेन, यांची चौकशी सुरू झाली. ही चौकशी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी केली. यानंतर काही दिवसातच मनसुख हिरेन यांचा मृत्यू संशयास्पदरितीने बुडून झाला.

विरोधकांनी हे प्रकरण उचलून धरत, या घटनेच्या चौकशीची मागणी केली. ज्यात हे प्रकरण एटीएस आणि एनआयए यांच्याकडे देण्यात आले. या चौकशीत अनेक खुलासे होत असून, सचिन वाझे यांच्याशी संबधित पाच कार जप्त झाल्या आहेत. सचिन वाझे यांचे सहकारी रियाझ काझी यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे. चौकशीतून बाहेर पडणारे धक्कादायक खुलासे गृहखात्याची, तसेच पोलीस खात्याची बदनामी करत आहेत अशी चर्चा आहे.

 

सचिन वाझे प्रकरण चांगलच तापलं असून, अनिल देशमुखांवर याची नैतिक जबाबदारी येत असल्याने, त्यांनी राजीनामा द्यावा असं विरोधक म्हणत आहेत. मुख्यमंत्री पदानंतर अतिशय महत्त्वाची जबाबदारी असणार हे पद, अनिल देशमुखांकडे नसावं, अशी चर्चा असून या सर्वांमुळे पवार साहेब नाराज असल्याच बोलल जात आहे.

सुशांत सिंग प्रकरण असचं गाजत असताना, राज्यात कायदा सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी गृहमंत्री अनिल देशमुखांची होती. परिणामी त्यांच्या गृहमंत्री पदावर टांगती तलवार दिसून येत आहे. पवार साहेबांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेत गंभीर दखल घेतली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, शरद पवारांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी त्यांची भेट घेतली असून, त्यांच्याबरोबर तासभर चर्चा केली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.