शरद पवारांनी वाहिली “या” जवळच्या मित्राला आदरांजली, केली भावनिक पोस्ट शेअर

0

बारामती : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा लोकसंग्रह व चाहते अनेक आहेत. तसेच त्यांच्या जीवनात अनेक मित्रांनादेखील महत्वाचे स्थान आहे. पवारांच्या सार्वजनिक जीवनातील अगदी सुरुवातीच्या काळापासून सहकारी असलेल्या अशाच एका जवळच्या मित्राचा फेसबुकवर फोटो शेअर करत, त्यांनी आपल्या “या” मित्राला मनापासून आदरांजली वाहिली आहे.

राज्य विधिमंडळातील माजी आमदार आणि ज्येष्ठ समाजसेवक ॲड. एकनाथ साळवे यांचे काल दुःखद निधन झाले. “ॲड. एकनाथ साळवे यांचे दु:खद निधन झाल्याचे ऐकून अतिशय वाईट वाटले. ॲड. एकनाथ साळवेंना विधिमंडळ सदस्य म्हणून ११ वर्षे अगदी जवळून पाहता आले. नंतरही त्यांची साथ आणि स्नेह सतत लाभला,” अशा शब्दांत, साळवेंसोबतचा एक जुना फोटो शेअर करत, त्यांनी साळवेंना आदरांजली वाहिली आहे.

सार्वजनिक कारकीर्दीच्या सुरुवातीलाच त्यांनी शिक्षकाचा पेशा सोडून कायद्याची पदवी घेतली आणि दलित, आदिवासी, शेतकरी, खाणकामगार यांना न्याय देण्यासाठी उभे राहिले. देशात सामाजिक ऐक्य असावे आणि लोकशाहीची फळे समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचावीत यासाठी परिवर्तनाचे आंदोलन उभारले. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सत्यशोधक किसान मंचाच्या माध्यमातून ते रचनात्मक संघर्ष करीत राहिले, असे शरद पवार म्हणाले.

ॲड. एकनाथ साळवे हे एक अतिशय विनम्र, स्वच्छ प्रतिमा असलेले, पुरोगामी व प्रतिभावान सामाजिक नेते होते. सामाजिक क्रांतीचा वसा घेतलेला विदर्भातील एक अभ्यासू आणि वैचारिक सहकारी गमावल्याचे दु:ख मला होत आहे. साळवेंच्या आत्म्याला चिरशांती मिळो व त्यांच्या कुटूंबियांना हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो ही प्रार्थना, अशा शद्बांत शरत पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.