शरद पवारांनी ममतांचा प्रचार करू नये, कॉंग्रेसची विनंती

0

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या राजकीय खेळीने भाजपचे महाराष्ट्रातील साम्राज्य संपुष्टात आणल्यापासून राष्ट्रीय राजकारणात देखील त्यांचा दबदबा निर्माण झाला आहे. सध्या शरद पवार पश्चिम बंगालच्या निवडणुकीत आपले राजकीय वजन टाकत असून त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली आहे. शरद पवार यासाठी समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल इत्यादी पक्षांची देखील मदत घेत आहेत.

पण शरद पवार यांच्या खेळीने काँग्रेस मध्ये मात्र नाराजी पसरली असून काँग्रेसचे पश्चिम बंगालमधील नेते प्रदीप भट्टाचार्य यांनी शरद पवारांना पत्र लिहून त्यांनी ममता बॅनर्जीचा प्रचार करू नये अशी विनंती केली आहे. काँग्रेसने भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या विरोधात बंगाल निवडणुकीत तिसरी आघाडी उघडली असून यासाठी काँग्रेसने डाव्या पक्षांशी युती केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसचा मित्र पक्ष असून त्याने बंगालमध्ये काँग्रेसच्या विरोधात प्रचार करू नये, अशी अपेक्षा काँग्रेसचे नेते व्यक्त करत आहेत.

शरद पवार सध्या राष्ट्रीय राजकारणात भाजपा आणि कॉंग्रेसच्या व्यतिरिक्त तिसऱ्या पर्यायाच्या निर्मितीसाठी झटत आहेत. बंगाल निवडणूक त्याचा एक भाग असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.

Read Also

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.