शरद पवारांनी केली कोश्यारींवर टीका, म्हणाले…

0

बारामती : विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्त्या अनेक दिवस उलटल्यानंतरही रखडल्या आहेत. अधिवेशनात या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवरही धरले होते. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी पक्षामध्ये  खडाजंगी झालेली दिसून आली. दरम्यान, गेल्या काही दिवसांत राज्यात घडलेल्या इतर काही घटनांमुळे, या मुद्द्याचा राजकारण्यांना विसर पडला होता. परंतु, आता परत या प्रशानला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी छेडले आहे.

 

काल बारामती येथे माध्यमांशी बोलताना असताना, शरद पवार यांनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे. “विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्त्या अनेक दिवस उलटल्यानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रखडवल्या आहेत. मोदी मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनादेखील तत्कालीन राज्यपालांनी अशाप्रकारचा त्रास दिल्याच्या तक्रारी त्यांनी केल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये देखील राज्यपाल याच पद्धतीने राज्यशासनाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी मात्र केंद्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. ही गोष्ट चिंताजनक आहे,” अशा शब्दांत पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

“घटनेनुसार राज्यसरकारने केलेल्या शिफारशींना मान्यता देणे, ही राज्यपालांची जबाबदारी असते. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लोकशाहीची आणि घटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी पाहिला नाही. हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केला, ही दुर्दैवी गोष्ट आहे, असा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे. सध्या शेतकरी वर्गाची स्थिती नाजुक आहे. यावरही बोलताना शरद पवार म्हणाले, कधी नव्हे ते राज्य मोठ्या आर्थिक संकटात आहे. मात्र राज्य सरकार या सर्व अडचणींमधून नक्कीच मार्ग काढेल.”

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.