शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त होणारी मॅराथॉन जिंकणाऱ्या ‘लता भगवान करे यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर

0

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त होणारी मॅराथॉन जिंकणाऱ्या ‘लता भगवान करे यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर

मवारी 22मार्च रोजी दिल्लीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पुरस्कारांची घोषणा झाली.या पुरस्कारात मराठी चित्रपट ‘लता भगवान करे’ एक संघर्षगाथा या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे.कोरोना साथीच्या धोक्याने यंदा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला असून मनोरंजन क्षेत्रही त्याला अपवाद राहिलेले नाही.गेली दोन वर्ष फारसे चित्रपट प्रदर्शित झालेले नाहीत.’लता भगवान करे’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून 66 वर्षीय लता भगवान करे या वृध्द स्त्रीच्या जीवनावर आधारित आहे.यापूर्वीही अनेक बायोपिक झालेले असून मिल्खा सिंग, मेरी कोम यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेले आहेत.परंतु हे प्रसिद्ध खेळाडू आहेत.यंदा प्रथमच लता करे या सर्वसामान्य स्त्रीच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे.

लता यांचे मूळ गाव हे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर हे आहे.गावात अपुरा रोजगार,दुष्काळ यांनी त्रासलेल्या लता भगवान करे यांनी बारामती गाठल व तेथे राहू लागल्या.त्यांनी अतोनात कष्ट करत आपल्या तीन्ही मुलींची लग्न लावून दिली.त्यांच्या या जिद्द आणि संघर्षमय जीवनावरील चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाल्याने सर्व क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झालेला दिसून येत आहे.हा चित्रपट नवीन देशबोई यांनी दिग्दर्शित केला असून चित्रपटात मुख्य भूमिका लता करेंनीच निभावली आहे.या चित्रपटात त्यांचे पती आणि मुलगा सुनिल करे यांनीही भूमिका केलेल्या आहेत.हा चित्रपट 17 जानेवारी 2020ला प्रदर्शित झाला होता.


लता भगवान करे यांचे पती ह्रदय विकाराने ग्रस्त होते परिणामी त्यांच्या उपचाराचा खर्च मोठा होता.या खर्चाची मिळवणी करण्यासाठी त्या शोध घेत असताना त्यांना राष्ट्रीवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मॅराथॉन घेत येण्यात असल्याची माहिती मिळाली,त्यांनी या स्पर्धेत सहभागी होत चक्क नऊवारी साडी नेसलेल्या लता करे आजी अनवाणी या स्पर्धेत धावतात आणि स्पर्धा जिंकतात तसेच पुढेही दोन वर्ष ही स्पर्धा जिंकत सलग तीन वर्षे स्पर्धा जिंकण्याची किमया करतात. त्यांच्या जिद्दीला प्रोत्साहन देत त्यांना आर्थिक मदतही केली गेली होती.चित्रपटाचेही हेच कथानक आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.