शरद पवारांची अनिल देशमुखांवर नाराजी! गृहमंत्री पद जाण्याची शक्यता?

0

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटकं प्रकरणी, अनिल देशमुख यांची गृहमंत्री पदावरून गच्छंती होण्याची शक्यात असून, एका मोठ्या नेत्याची या पदासाठी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ज्याप्रकारे मनसुख हिरेन किंवा पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण किंवा सध्या राज्यात गाजत असलेलं सचिन वाझे प्रकरण हाताळलं आहे, त्यावरुन शरद पवार हे अनिल देशमुख यांच्यावर नाराज असल्याने, सध्या ही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

आज देशमुख यांनी दिल्ली दरबारी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गृह विभागाच्या कामकाजाविषयी माहिती घेतल्याचं समजत आहे. तसेच पवारांनी मागील काही दिवसात राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली आहे. शरद पवारांच्या भेटीनंतर अनिल देशमुख म्हणाले की, “मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं सापडल्याच्या प्रकरणाचा तपास आता एनआयए आणि एटीएस करत असून, ‘एनआयए’ला राज्य सरकारकडून संपूर्ण सहकार्य केले जात आहे.”

तसेच एनआयए चा संपूर्ण अहवाला आल्यानंतर, जे यात दोषी आढळतील त्यांवर कारवाई करण्यात येईल, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केलं. पवार यांच्यासोबत मुंबईच्या सध्याच्या घडामोडीवरही चर्चा झाल्याचं अनिल देशमुखांनी सांगितलं. ते म्हणाले की, “मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी स्पोटकं सापडली होती त्याचा तपास आता एनआयए आणि एटीएस चांगल्या प्रकारे करत आहेत.”

Read Also

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.