वाझेंच्या अटकेवर शरद पवारांची “ही” प्रतिक्रिया

0

बारामती : रविवारी माध्यमांशी बोलत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा व ज्येष्ठ नेते शरद पवारांनी राज्यात सुरु असलेल्या अनेक घटनांवर भाष्य केले. विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्त्यांवरूनही त्यांनी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर टीका केली. त्याचबरोबर देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरूनही त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना केलेल्या अटकेबद्दलही भाष्य केले.

 

सध्या मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या वाहन तपास प्रकरणामुळे राज्यात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना सचिन वाझे यांच्या अटकेविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली, त्यावर बोलताना पवार यांनी, “हे प्रकरण स्थानिक आहे. त्यामुळे या प्रकरणावर मी जास्त बोलणे योग्य ठरणार नाही,” असे मोघम वक्तव्य केलं आहे. याअधीही शरद पवारांनी गुन्हे शाखेचे अधिकारी सचिन वाझे यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे आणि एकंदरच याप्रकरणाच्या हाताळणीवरुन त्यांनी नापसंती दर्शविली होती.

त्याचबरोबर, “महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लोकशाहीची आणि घटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी पाहिला नाही,” असा टोलाही त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे. सध्या शेतकरी वर्गाची स्थिती नाजुक आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, कधी नव्हे ते राज्य मोठ्या आर्थिक संकटात आहे. मात्र राज्य सरकार या सर्व अडचणींमधून नक्कीच मार्ग काढेल.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.