रेमडेसिवर इंजेक्शन साठी आमदाराने मोडली ९० लाखाची एफ.डी

0

महाराष्ट्रात रेमडेसिवर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड, याचा मोठा तुटवडा भासत आहे. मिळवण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात धडपड होत आहे. लोकांना अशाच काळात सहकार्य करण्यासाठी आमदार देवदूता सारखे धावून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर स्वताच्या जिल्हातील जनतेसाठी रेमडेसिवर इंजेक्शन आणण्यासाठी शिवसेना आमदाराने चक्क आपली 90 लाख रुपयांची एफ.डी मोडली आहे.

जिल्ह्यातील प्रशासनाच्या मदतीसाठी हिंगोली मधील शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी सहकार्य केलं आहे. त्यांनी सहकार्याच्या भावनेने आपली एफ.डी मोडत माणुसकीचे दर्शन करून दिले आहेत. लोकांना आज त्यांच्या बद्दल अभिमान वाटतो आहे. त्यांच्या या दातृत्वावर जनता भलतीच खुश आहे!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.