‘राम सेतु’ चित्रपटाची शूटिंग सुरू!

0

अक्षय कुमारच्या आगामी ‘राम सेतु’ या चित्रपटावर काम सुरू झाले आहे. शनिवारी रात्री चित्रपटाचे पहिले स्क्रिप्ट रीडिंग सेशन झाले, ज्यात अक्षय सोबत जॅकलिन फर्नांडिज आणि नुसरत भरुचा हि होती. याबाबत माहिती देताना अक्षयने सोशल मीडियावर लिहिले की, “याची सुरुवात होण्याची प्रतीक्षा करू शकत नाही.” या चित्रपटाची निर्मिती केप ऑफ गुड फिल्म्सच्या बॅनरखाली केली जात आहे. अक्षय आणि नुसरत पहिल्यांदा या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. तर जॅकलिन अक्षयबरोबर बॅक टू बॅक चित्रपट करत आहे. अलीकडेच या दोघांनी ‘बच्चन पांडे’ चे शूटिंग पूर्ण केले आहे आणि आता ते ‘राम सेतू’ वर काम करताना दिसतील.

आमिर खान आणि एली अवरामवर चित्रित ‘हरफनमौला’ गाण्याचा पहिला लूक समोर आला आहे. सोशल मीडियावर शेअर करत एली अवरामने लिहिले की, “तो प्रत्येक गोष्टीत हरफनमौला आहे आणि डान्स फ्लोरची मल्लिका आहे. १० मार्चला त्याला भेटायला तयार राहा.” हे गाणे आमिरचा मित्र अमीन हाजीच्या ‘कोई जाने ना’ या चित्रपटात दिसणार आहे. दिग्दर्शक म्हणून हा अमीनचा पहिला चित्रपट असून आमिरने त्याच्या ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटाच्या शूटिंगला ब्रेक लावून त्याने हे गाणे शूट केले. या चित्रपटात कुणाल कपूर आणि अमायरा दस्तूर हे मुख्य भूमिकेत आहेत.

३४ वर्षांनंतर अनुपम खेर पुन्हा एकदा तेलगू चित्रपटात परतला आहे. चंदू मोंडेट्टी दिग्दर्शित ‘कार्तिकेय २’ चित्रपट करण्यास त्याने होकार दिला आहे. रविवारी अनुपमच्या ६६ व्या वाढदिवशी चित्रपटाच्या टीमने याची घोषणा केली. या चित्रपटात खेर धन्वंतरीच्या भूमिकेत दिसणार आहे. निखिल सिद्धार्थ अभिनीत या चित्रपटाचे शूटिंग सध्या द्वारकामध्ये सुरू आहे. यापूर्वी अनुपमने १९८७ चा तेलगू चित्रपट ‘त्रिमूर्तुलू’ मध्ये काम केले होते. अनुपमने आपल्या कारकीर्दीत सुमारे २०० चित्रपटांत काम केले आहे. त्यापैकी हिंदी चित्रपट सर्वाधिक आहेत. तथापि, तो तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये देखील दिसला आहे.

राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर स्टारर फिल्म ‘बधाई दो’ चे शूटिंग पूर्ण झाले आहे. चित्रपटाचे शूटिंग जानेवारीच्या सुरूवातीला जंगल पिक्चर्सच्या बॅनरखाली सुरू झाल होतेे. प्रॉडक्शन हाऊसने सोशल मीडियावर त्याचे पॅकअप जाहीर केले आहे. राजकुमार ‘बधाई दो’ मध्ये पोलिस म्हणून दिसणार आहेत, तर भूमी त्यात पीटी शिक्षक आहेत. हर्षवर्धन कुलकर्णी दिग्दर्शित हा चित्रपट २०१८ सालचा आयुष्मान खुराना, सान्या मल्होत्रा, नीना गुप्ता आणि गजराज राव स्टारर फिल्म ‘बधाई हो’ चा सिक्वल आहे. यंदा हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.