रात्रभर पाण्यात भिजवून खा या पाच वस्तू म्हातारपण पळवून लावा.

0

बालपण, तरूणपण आणि वृध्दावस्था या निसर्गाच्या न बदलता येणार्या अवस्था आहेत. परंतु काहीवेळा चुकीच्या आहार पध्दतीमुळे थकवा, आजार, चिडचिडेपणा, ताण इत्यादी त्रास जाणवू लागतात. निसर्गाध बहाल केलेली अवस्था निरोगी आणि आनंदान जगण्याच अधिकार प्रत्येकाला आहे परंतु चुकीच्या जीवनशैलीमुळे तो दुरावत जातो. काही लोक म्हातारी होतच नाहीत ती नेहमी चिरतरूण राहतात, यासाठी फार खर्च किंवा प्रयत्न लागत नाहीत तर निसर्ग नियम पाळणे गरजेचे असते. रात्रीची झोप, सकाळी योग्य वेळी जाग, योग्य सकस आहार, व्यायाम ताणमुक्त जीवनशैली यान तरूण राहण सहज शक्य आहे. आपले घरगुती ५ उपाय करून तुम्ही आनंदी आयुष्य नक्कीच जगू शकता, चला बघूया ते पाच उपाय.

१) अलसी – व्हिटामिन, मिनरल्सचा खजिना असणारी अलसी कोलेस्ट्रॉल घटवते. अलसीच्या एक चमचा बिया एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर अनुषापोटी बिया व पाणी सेवन करा.
२) बदाम – कॅल्शिअम, प्रोटीन असणारे बदाम हाडक्षमजबूत करतात. इम्युनिटी वाढवतात. रोज रात्री ४ ते ५ बदाम पाण्यात भिजत घाला, सकाळी उठल्यावर बदामाची साल काढा आणि अनुषापोटी खावा.
३) हरभरे – हरभरे घोड्यांनाही खायला दिले जातात. हरभर्यांमुळे रक्त वाढत तसेच रक्त साफ होते. अंगदुखी दूर होते. ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते. रोज रात्री चमचाभर हरभरे १ ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर अनुषापोटी हे हरभरे सेवन करा.
४) मेथी दाणे – मेथी दाण्यांमुळे चिरतरूणपण येते. शुगर दूर होते. पोटापासून ह्रदयापर्यंतच्या आजारात मेथीदाणे उपयुक्त आहेत. रोज रात्री १ चमचा मेथीदाणे १ ग्लास पाण्यात भिजवून ठेवा सकाळी उठल्यावर अनुषापोटी मेथीदाणे आणि पाणी सेवन करा.
५) मनुका – शुगर असलेल्यांनी हा उपाय करू नये. मनुक्यामुळे रक्त वाढते, लोह वाढते. किडनी, लिव्हर साफ होते. दिवसभर एनर्जी जाणवते. रक्त साफ असेल तर १५० रोगांपासून बचाव होतो. रोज रात्री ८ ते १० मनुका १ ग्लास पाण्यात भिजवा, सकाळी अनुषापोटी खावा.

मित्रांनो वरील उपाय करताना प्रत्येक आठवड्याला एक पदार्थ अस करा. म्हणजे महिन्यात चार पदार्थ रिकव्हर होतात. वरील उपायांचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही. तेव्हा उपाय करा आणि रिप्लाय द्या. गरज असल्यास तज्ञांचा सल्ला घ्या.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.