राज्यातले नेते भेटले, पण संभाजी राजेंना खरी भेट पंतप्रधान मोदींनी द्यायला हवी – संजय राऊत!

0

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. या मुद्द्यावरून खासदार संभाजी राजे भोसले यांनी महाराष्ट्रातील विविध नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीप्पणी केली आहे.

खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीच्या नंतर संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या समोर ५ मागण्या ठेवल्या आहेत. त्यापूर्ण करण्यासाठी ६ जूनपर्यंतचा वेळ दिला आहे. त्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

छत्रपती संभाजी राजे यांच्या आरक्षणाच्या मागणी बद्दल पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारले असता संजय राऊत म्हणाले. “खासदार संभाजी राजे हे महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. ते एक महत्वाचे नेते सुद्धा आहेत. मराठा आरक्षणाच्या भूमिकेशी आम्ही त्यांच्याशी सहमत आहोत. त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्या. पण त्यांना खरी भेट ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यायला हवी. कारण मराठा आरक्षणाचा प्रश्न आता केंद्राच्या हातात आहे हे सुप्रीम कोर्टाच्या निकालातून स्पष्ट झालंय”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.