रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण

0

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सर्वच स्तरावर रुग्ण आढळून येत आहेत.राज्यात सर्वाधिक रुग्ण संख्या असून मुंबई हॉटस्पॉट ठरत आहे.आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्यामुळे येणारे परकीय लोक तसेच वाढती गर्दी यामुळे वेगाने साथ पसरत आहे.कोरोना साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात नवे निर्बंध लावले असून काही जिल्ह्यात लॉकडाऊनही करण्यात आला आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि त्यांची पत्नी सौ रश्मी ठाकरे यांनी 11मार्च रोजी मुंबईच्या जे जे रुग्णालयात कोव्हॅक्सीन लसीचा प्रथम डोस घेतला.परंतु 12 दिवसाच्या आतच कोरोना लागण झाली आहे.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी सौ रश्मी ठाकरे यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आलेला आहे.त्या सध्या वर्षा निवासस्थानीच होम क्वारंटाईन झालेल्या आहेत.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सुपुत्र कॅबिनेट मंत्री अदित्य ठाकरे काही दिवसांपूर्वी कोरोनाचा पॉझिटीव्ह असल्याचे निदान झाले होते,परिणामी त्यांच्या संपर्कात आलेल्या उध्दव ठाकरेंना होम क्वारंटाईन व्हाव लागल होत.त्यातच रश्मी ठाकरे यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यांनी संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.दरम्यान रश्मी ठाकरेंनी ‘मला कोरोनाची कमी तीव्र लक्षणे जाणवत होती त्यामुळे मी चाचणी करून घेतली वती पॉझिटीव्ह आली आहे.तरी माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती त्यांनी ट्विट करून केली होती.

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून दिवसात सरासरी 3 हजार 512 नव्या रुग्णांची भर पडली.सध्या मुंबईत 26हजार 672 अॅक्टीव रुग्ण आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.