रशियामध्ये शिकणाऱ्या पुण्यातील तरुणाचा मृत्यू; खा.सुप्रिया सुळेंच्या प्रयत्नातून नातेवाईकांना घडले शेवटचे दर्शन!

0

रशिया मध्ये शिक्षण घेणाऱ्या पुणे जिल्ह्यातील २२ वर्षीय तन्मय आबासाहेब बोडके या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. रशियातील निझनी नोवागोर्ड विद्यापीठात एमबीबीएस चे शिक्षण घेत होता. मात्र मागील काही दिवसांत त्याचे अचानक वजन वाढायला लागले. त्याला नंतर नंतर चालणे सुद्धा अशक्य झाले. दवाखान्यात उपचार सुरू असताना त्याला कर्करोग झाल्याचे दिसून आले. कर्करोगावर उपचार सुरू असतानाच त्याचा रक्तदाब कमी झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

देशातील कोरोना मुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यात तन्मयचा अशा परिस्थिती मध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना तन्मय चे शेवटचे दर्शन सुद्धा होईल असे वाटत होते. कारण त्याचा मृतदेह भारतात कसा आणायचा हा सगळ्यांच्या समोर मोठा पेच होता. अशाच मध्ये मृत तन्मय चे नातेवाईक श्रीकांत बोडके यांनी ही बाब बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कानावर घातली. यानंतर सुप्रिया सुळे यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि रशियन दुतावासाशी संपर्क साधून मृत तन्मयचं पार्थिव मायदेशात आणण्याबाबत पाठपुरावा केला. त्यानंतर खा. सुळे यांच्या प्रयत्नांना यश मिळून अखेर मृतदेह भारतात आणणं शक्य झालं आहे. तन्मय चे नातेवाईक मनापासून सुप्रिया ताईंना निश्चित धन्यवाद देत असतील या मध्ये मात्र शंका नाही!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.