युवा नेतृत्व पार्थ पवार यांचा आज वाढदिवस – घरातून मिळालेला समाज कार्याचा वसा पुढे चालवणार

0

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू मा.पार्थ पवार यांना राजकीय पार्श्वभूमी वारशातच मिळाली असून आत्या सुप्रिया सुळे आणि बंधू रोहीत पवार यांच मार्गदर्शन त्यांना वेळोवेळी मिळत असते.इतक असूनही पार्थ पवार यांच स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असून एक व्यावसायिक अशी त्यांची ओळख आहे.समाजकारण आणि राजकारण यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासून घरातच मिळालेले आहेत.पार्थ पवार यांच्या नम्र स्वभावाची झलक नेहमी दिसून येते.कार्यकर्त्यांना मैत्रीची वागणूक देण्याबरोबरच त्यांच्या अडचणी दूर करण्यास ते सदैव तत्पर असतात.2019 साली झालेल्या निवडणुकीत जरी त्यांचा पराभव झाला असला तरी हे आशादायी नेतृत्व समाजकार्यात व्यस्त आहे.पार्थ पवार आपल काम करत जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यांची ही धडपड सातत्याने दिसून येते.

 

अजित दादांच्या या सुपुत्राचा जन्म 21 मार्च 1990 रोजी झाला.अवघ्या 31 वर्षाच्या या तरुण नेत्यान राजकारणात स्वताच अस्तित्व निर्माण करण्याचा स्वतंत्र प्रयत्न केला आहे.पार्थ पवार यांच शालेय शिक्षण महाराष्ट्रात पार पडल तसेच एच आर कॉलेजमधून त्यांनी कॉमर्सची डिग्री घेतलेली आहे.या शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी लंडन गाठ व दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे.लंडनहून परतल्यानंतर त्यांच्यावर घरच्या व्यवसायाची जबाबदारी पडली ती त्यांनी लीलया पेलून धरली.घराच्या व्यवसायात लक्ष घातले असल्याने राजकारणात त्यांची फारशी चर्चा नव्हती इतकच काय पवार कुटुंबानेही कधी त्यांना चर्चेत आणल नाही.त्यांचे वडील अजित पवार यांनीही कधी त्यांच्या उमेदवारीची चर्चा केली नाही.पार्थ स्वता निर्णय घेईल इतकच ते सांगत असत.राजकारण वारंवार टाळत आलेल्या पार्थ पवारांना 2019 साली मात्र कार्यकर्त्यांनी केलेल्या आग्रहामुळे उमेदवारी स्वीकारावी लागली,पार्थ पवार या निवडणुकीत हरले.ही हार मोठ्या मनाने स्वीकारत त्यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला तसेच कार्यरत राहण्याच्या सूचना दिल्या.घरातील राजकारणाचा कोणताही बडेजाव न करणारा हा नेता लोकप्रिय न ठरला तरच नवल होत.सध्याही ते सतत व्यस्त असतात.

मावळ मतदार संघातील हार खिलाडूवृत्तीने घेत पार्थ पवार यांनी कोरोनो काळात पुणे, मुंबई, नाशिक येथे अडकलेल्या विद्यार्थी आणि कामगारांची जेवणाची सोय केली.तीन लाखांपेक्षा अधिक मास्क तसेच सॅनिटायजरच वाटप केल.रायगडमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्ती चक्रीवादळात असंख्य लोकांची घर,बागा जमीनदोस्त झाल्या या लोकांना तातडीची मदत म्हणून गहू, तांदूळ तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या पोहोच केल्या.पार्थ पवार हे मावळ मतदार संघातील भावी नेतृत्व असून त्यांच्या पुढील वाटचालीस तसेच वाढदिवसाला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.