मोठी बातमी! नागपुरात ३१ मार्चपर्यंत वाढवला लॉकडाऊन

0

नागपूर : सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात राज्यातल्या नशिक, पुणे, नागपूर, मुंबईसारख्या महानगरांमध्ये, रुग्णांच्या संख्येत अधिक वाढत होत असून, मागील काही दिवसांपासून नागपूर शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, नागपूर शहरात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढवून, कडक निर्बंध लावण्यात आल्याची महिती, पालकमंत्री नितीन राऊत यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना शनिवारी दुपारी केली आहे.

नागपूर शहरात कालच्या एकाच दिवसात ३ हजार २३५ नव्या रुग्णांची नोंद झाली. यात नागपूर शहरात २ हजार ५२४ रुग्णांचा समावेश आहे, तर ग्रामीण भागात ७०८ रुग्णांचा समावेश आहे. याआधीही नागपूरमध्ये लॉकडाऊन लावल्यानंतरही कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली नसल्यामुळे, नागपूर शहरात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढवून, कडक निर्बंध लावण्यात आल्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. यावेळेस त्यांनी नवी नियमावली जाहीर केली.

  • जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ४ पर्यंत खुली
  • भाजीपला दुपारी ४ वाजेपर्यंत मिळणार
  • हॉटेल, रेस्टॉरंट संध्याकाळी ७ पर्यंत खुले राहणार, ऑनलाईन पद्धतीने रात्री ११ पर्यंत डिलिव्हरीसाठी मुभा
  • परीक्षा कोविड नियमांअतर्गत होतील
  • शाळा आणि कॉलेज बंद राहणार

आज नागपुरातील विभागीय आयुक्त कार्यालयात, लॉकडाऊन संदर्भातली, महत्त्वाची बैठक पालकमंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत, सर्व लोकप्रतिनिधींसोबत पार पडली. या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते, व्यापारी वर्गाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शहरातील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या चाचणीचे नमुने दिल्लीत पाठवले आहेत. मात्र त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, दिल्लीतून आम्हाला हा अहवाल लवकरात लवकर मिळवून द्यावा. अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. तसेच, निर्बंधांमुळे अर्थचक्राला कोणतीही बाधा येणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.