मिठाईच्या डब्यात सापडल कोट्यवधी रुपयांच परकीय चलन

0

काही घटना खरच थक्क करणाऱ्या असतात.निसर्ग निर्मित घटना माणसाला नेहमीच अचंबित करत असतात.परंतु मानव निर्मित काही शक्कल बघूनही आश्चर्य वाटत असते.असच काहीस हैदराबाद विमानतळावर घडल असून घटनेत 1कोटी 3लाख रुपये मूल्याच परकीय चलन पकडण्यात आल आहे.सीआयएसए म्हणजेच केंद्रीय सुरक्षा दलाने हे चलन नियमित एक्स रे तपासणीत एवढ मोठ परकीय चलन जप्त करण्यात आल आहे.विशेष म्हणजे तस्काराने या नोटा ज्या पध्दतीने लावल्या होत्या ते पाहून काहीकाळ अधिकाराही चकीत झाले.

 


अनेक देशांत असलेल्या हे परकीय चलन दुबईत नेण्यात येत असल्याची माहिती समोर आली आली आहे.या प्रकरणी एका भारतीय धागरिकाला अटक करण्यात आली असून त्याला कस्टमकडे सोपवण्यात आल आहे.अटक केलेल्या आरोपी नाव मोहम्मद मुस्तफा असून त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याची व त्याच्या सामानाची एक्स रे मशीनमधून तपासणी करण्यात आली, ज्यात मिठाईचे बॉक्स दिसले परिणामी बारकाईने तपासले असता त्यात परकीय चलन असल्याचे लक्षात आल.याबाबत मोहम्मद मुस्तफला चौकशी दरम्यान कोणतही समाधानकारक उत्तर देता आल नाही.

परिणामी कस्टमला बोलावून त्यात त्याची अधिक माहिती घेण्यात आली ज्यात तो हैदराबादचाच असून दुबईला जात होता अस समोर आल आहे.

आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या चलनात डॉलर, पाऊंड, रुपये व इतरही नोटा आहेत.या नोटा आरोपीने अतिशय शिताफीने मिठाईच्या बॉक्समध्ये लपवल्या होत्या.एवढ्या मोठ्या प्रमाणावर चलन सापडल्याने त्याचा उगम कोणता, कुणाकडे देण्यात येणार होत्या, का देण्यात येणार होत्या याची चौकशी सुरू आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.