माजी मंत्र्याच्या मुलीच्या हातात झाडू, राज्यमंत्र्याच्या मुलाने उचलल्या गाद्या; कोरोना रुग्णांसाठी मंत्र्यांची मुलं सरसावली.

0

काम लहान मोठे नसते तर काम करणारी हात ही मोठी असतात. या कोरोनाच्या परिस्थिती मध्ये एकमेकांवर आरोप होत असताना माजी मंत्र्यांचे मुले ही आपल्या चांगली आणि प्रामाणिक कामामुळे चर्चेचा विषय बनली आहेत.

महाराष्ट्राचे राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव सध्या कोरोनाच्या परिस्थिती मध्ये चांगलेच सक्रिय झाले आहेत. इंदापूर येथे व्ही.पी. कॉलेज मध्ये १०० बेड चे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. श्रीराम भरणे यांनी स्वतः त्या ठिकाणी गाद्या उचलत कोविड सेंटर येथील बेड वरती ठेवल्या. राज्यातील परिस्थिती पाहता आपण काम करणे गरजेचं आहे. काम लहान मोठे नसते तर काम काम असते अशी भूमिका घेतली. आजू बाजूला उभा असणाऱ्या प्रतिष्ठित मंडळीला पण पुढाकार या मुळे घ्यावा लागला. कामाच्या बाबतीत श्रीराज यांनी यांनी पुढाकार घेतल्याने राज्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.


माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. इंदापूर तालुक्यातील बावडा ग्रामीण रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला. त्या वेळी आजूबाजूच्या परिसरात पाहिले असता अस्वच्छता त्यांना दिसून आली. रुग्णालय स्वतः परिसर स्वच्छ करण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेत सुरुवात केली. कामाची सुरुवात ही स्वतः पासून केली ही गोष्ट सर्वांनाच आवडल्याने चर्चेत आहे.

सोलापूर जिल्ह्यात श्रीराज भरणे आणि अंकिता पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सगळीकडे सुरू आहे. कारण अडचणीच्या काळात ते स्वतः रस्त्यावर उतरून जनतेच्या साठी अहोरात्र काम करताना दिसून येत आहेत. कसलीही कोणावर टीका टिप्पणी न करता कामाला महत्त्व देणे जनतेला फारच आवडले आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.