महाविकास आघाडी सरकारने शब्द पाळला : रिक्षा चालकांच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात!

0

महाविकास आघाडी सरकार ने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सगळ्याच बाजूने प्रयत्न केले आहेत. अशाच काळात राज्य सरकारने विविध गोष्टींवर निर्बंध घातले आहेत. या अनुषंगाने शासनाने राज्यातील रिक्षा परवाना धारकांना प्रत्येकी 1500 रूपये अनुदान देण्याचा निर्णय सरकार ने घेतलेला आहे.

रिक्षा चालकांच्या खात्यात पैसे जमा करत सरकारने कुटुंब चालवण्यासाठी चांगलाच हातभार लावला आहे. ही रक्कम खात्यावर जमा होण्यासाठी सुरुवात झाली आहे. बारामती येथील १८२९ परवानाधारक रिक्षा चालक आहेत. या पैकी ७५१ रिक्षा परवानाधारक यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. या मधील ५०६ ऑनलाइन अर्जाना मंजुरी देण्यात आली आहे. तर उर्वरित 141 अर्जाची छाननी सध्या सुरू आहे.

रिक्षा चालकांच्या खात्यात १५०० रुपये जमा करत अर्थ सहाय्य देण्यात आला आहे. या बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. या साठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोणतेही कागदपत्र सादर न करता केवळ ऑनलाईन प्रणालीवर त्यांचा वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक आणि आधार क्रमांक नोंद करावा लागणार आहे. सदर माहिती संगणक प्रणालीवर प्रमाणित करण्यात येईल.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.