महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार ?

0

मुंबई : देशात लाॅकडाऊनची वर्षपूर्ती होत असतानाच कोरोनाचा धोका पुन्हा वाढत असल्याच दिसून येत आहे. विशेषत:महाराष्ट्रात हा धोका वाढल्याच दिसून येत आहे.महाराष्ट्रात सध्या सरासरी 3000 रुग्ण वाढत असल्याच दिसून येत आहे.मार्च व एप्रिलच्या मुलांच्या सुट्टया, होळी, गुढी पाडवा असे येणारे सण यामुळे परगावी असणारे अनेक जण आपल्या मुळ गावी परतण्यासाठी उत्सुक आहेत परिणामी या प्रवासात कोरोना साथ पसरण्याची शक्यता वाढलेली आहे.

मुंबईतील अनेक चाकरमानी यंदा शिमग्याला कोकणात जाण्यास इच्छुक आहेत परंतु स्थानिक प्रशासनान कोरोनो निगेटिव्ह रिपोर्ट आणल्यासच गावात प्रवेश मिळेल अस जाहीर केल आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येच्या 60टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. राज्यात सध्या अॅक्टीव रुग्ण संख्या 166353 इतकी आहे.महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबईत सध्या 16721अॅक्टीव रुग्ण असून ही संख्या वाढतच आहे. मुंबईसाठी ही चिंतेची बाब असून धारावीत पुन्हा रुग्ण आढळत आहेत. आज अखेर 58 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.मुंबईत 40 चाळी व झोपडपट्या तसेच 267 इमारती सील केल्या आहेत. या ठिकाणांना कंटेन्मेट झोन केल आहे.

मुंबईसह राज्यात पुणे,  बुलढाणा,  औरंगाबाद, नागपूर, नाशिक येथे कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.पैकी नागपुरात 3796 रुग्ण आहेत.नाशिकमध्येही ही संख्या वाढत आहे.राज्यात सध्या 7801रुग्णांना आॅक्सीजनची गरज लागली असून आॅक्सीजनची मागणी वाढत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनो परिस्थिती व लॉकडाऊन याविषयी पत्रकार परिषद घेतली.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सध्या नंदुरबार दौऱ्यावर असून तेथे त्यांनी लसीकरणाचा आढावा घेतला. तसेच मोलगी आणि धडगाव उपजिल्हा रुग्णालयाना भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. पोषण पुनर्वसन केंद्राची माहिती घेतली. दरम्यान या ठिकाणीच पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीवर केलेल्या उपाययोजना मांडल्या. ते म्हणाले लसीकरणाचा वेग वाढवणार असून त्यासाठी केंद्राने पुरेसा साठा पुरवण्याची ग्वाही दिली आहे.

धारावीत लसीकरणाची वेगळी सोय केली असून त्यांच वेगळ नियोजन केल्याच त्यांनी स्पष्ट केल.बी.एम.सी ने गर्दी नियंत्रणावर निर्बंध घातले असून मॉल्स, पब, रेल्वे स्थानकावर अँटीजेन टेस्ट करण्यात येतील तसेच कार्यालय, समारंभ, यात लोकांची उपस्थिती ठराविक ठेवण्यात येईल म्हणजेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थिती 50 टक्के तसेच समारंभात 50 जणांना परवानगी असल्याच सांगितल. तसेच मास्क व सोशल डिस्टन्सींग पाळण्याच्या दृष्टीने नागरिकांना आवाहन करत असून जनतेच सहकार्य अपेक्षित आहे हे स्पष्ट केल.

महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णसंख्या वाढत आहे.सर्व स्तरात रुग्ण आढळून येत असून सगळ्यांनी काळजी घेण व नियम पाळण गरजेच असल्याच सांगितल.महाराष्ट्रात अजून कोरोनाचा दुसरा स्ट्रेंथ नसल्याच त्यांनी स्पष्ट केल.85 ते 90 टक्के रुग्णात कोणतीही लक्षण दिसून येत नसल्याने गाफिलता वाढू शकते परिणामी रुग्ण सार्वजनिक ठिकाणी वापरल्यास साथ पसरू शकते अशी शंका व्यक्त केली.महाराष्ट्रात जेथे तातडीची निकड आहे तेथे प्रशासनाच्या विचारानुसार लॉकडाऊन केल्याच ते म्हणाले.लॉकडाऊन हा उपाय नसला तरी साथ पसरू नये या काळजीन हा निर्णय घ्यावा लागल्याच सांगितल.

महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार का?या प्रश्नावर उत्तर देताना कोरोनो वाढू नये या दृष्टीने शासनाने कठोर पावले उचलली असून स्थानिक प्रशासनालाही हाय अलर्ट केलेल आहे परिणामी जनतेने सहकार्य करत त्रिसूत्री म्हणजेच मास्क, सोशल डिस्टन्सींग आणि सॅनिटायजरने किंवा साबणाने हात धुण्याचे नियम पाळावेत अस आवाहन केल.जनतेन स्वताची काळजी घ्यावी व पात्र लोकांनी लस घ्यावी अस आवाहन केल.लस ही कोरोनो विरोधातील ढाल असून ती अत्यंत सुरक्षित असून निशंकपणे ती घेण्याच सांगितल.

“मी स्वता लस घेतली असून तुम्हीही घ्या.”असही ते म्हणाले.लसीबाबत कोणताही पूर्वग्रह दूषित न ठेवता सकारात्मकतेने लस घ्यावी अस सांगितल.लस घेतली तरी गाफिल न राहता सोशल डिस्टन्सींग, मास्क आणि हात धुण्याचे नियम पाळण गरजेच असल्याच त्यांनी सांगितल.जनतेचे आभार मानताना ते म्हणाले की, मागील लॉकडाऊन काळात जनतेने उत्तम सहकार्य केल असून आताही नियम पाळून सहकार्य कराव या संकटाशी मिळून लढाया अस त्यांनी सांगितल.परिणामी लॉकडाऊन लागणार नाही.सध्यातरी लाॅकडाऊनचा विचार नसून रुग्णसंख्या वाढल्यास तातडीचे निर्णय घ्यावे लागतील असे त्यांनी स्पष्ट केल.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.