मंत्रिमंडळामध्ये होऊ शकतात मोठे फेरबदल, “या” नेत्याची लागू शकते मंत्रीपदासाठी वर्णी

0

मुंबई : राज्यात गाजत असलेल्या सचिन वाझे प्रकरणामुळे, राज्य सरकार अडचणीत सापडल्याचे चित्र, सरकारच्या झालेल्या गेल्या काही दिवसांतल्या मॅरेथॉन बैठकांमुळे आता स्पष्ट झाले आहे. या प्रकरणामुळे राज्य सरकारची प्रतिमा खालावली असल्याने, ती सुधारण्यासाठी आता महाविकास आघाडीने काही निर्णय घेण्याचे ठरवले आहे. मुंबई पोलीस आयुक्तांची झालेली बदली हा त्यापैकीच एक होता.

 

दरम्यान, आता शक्यता अशी वर्तवली जात आहे की, मंत्री मंडळामध्येदेखील काही फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार काँग्रेसमध्येही अंतर्गत बदल केले जाणार असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मंत्रिपदासाठी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

 

यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आज गुरुवारी रात्री दिल्लीला जाणार आहेत. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री नितीन राऊत, सुनिल केदार हे नेते दिल्लीत पोहचणार असल्याची माहिती मिळत आहे. या भेटीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत गाठीभेटी होणार असून, राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यातील काँग्रेसचे पुढील धोरण, अडचणी वाढवणारे मुद्दे, पक्षाअंतर्गत नाराजी यांवर ते चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

माहितीनुसार, होळी आणि पौर्णिमेनंतर महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांचे खाते हे बदलले जाणार आहे. यासंदर्भात “मंत्रिमंडळात फेरबदलासंदर्भात सोनिया गांधी, शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. लवकरच तुम्हाला याबद्दल कळेल,” अशी मोजकी आणि सूचक प्रतिक्रिया नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दिली प्रसारमाध्यमांना दिली होती.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.