
भिकारी समजून रजनीकांतला घातली भीक
थलयवा म्हणून प्रसिध्द असणारा रजनीकांत तामिळ सुपर स्टार आहे. त्याच्या चित्रपटांनी कमाईचे अनेक रेकाॅर्ड मोडलेले आहेत. रजनीकांत नेहमीच त्यांच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी प्रसिध्दीत असतात. रजनीकांत यांच मूळ नाव शिवाजीराव गायकवाड असून ते बस कंडक्टर होते. बस कंडक्टर ते सुपर स्टार हिरो हा त्यांचा प्रवास अत्यंत कष्टाचा राहिलेला आहे. याच रजनीकांत यांचा एक भावस्पर्शी किस्सा जाणून घेऊया.
२००७ मध्ये रजनीकांत यांचा शिवाजी हा चित्रपट ब्लाॅक बस्टर ठरलेला होता. या आनंदातच रजनीकांत मित्रांसमवेत मंदिरात देवदर्शनासाठी गेलेले होते. अतिशय साधारण कपडे घातलेल्या रजनीकांतला एका महिलेने भिकारी समजून १० रुपयांची नोट दिली. रजनीकांतनीही अत्यंत विनम्रपणे ही भीक घेतली नंतर मंदिरात जाऊन त्यांनी देवीचरणी स्वताजवळचे १० रुपये ठेवले.
महिलेच्या नंतर लक्षात आले की, हा सुपरस्टार रजनीकांत आहे. तिनी त्यांची माफी मागितली व १० रुपये परत मागितले. रजनीकांत म्हणाले हे १० रुपये माझ्यासाठी आशिर्वाद आहेत. वैयक्तिक जीवनात अत्यंत साधारण राहणार्या रजनीकांत यांची वर्तणूकही अत्यंत साधी आहे.