भारताला दिडशे वर्षे पारतंत्र्यात ठेवणाऱ्या ब्रिटीश राजघराण्याचे शार्ली हेब्दो या साप्ताहिकाने काढले वाभाडे

0

शार्ली हेब्दो हे पॅरिसमधील साप्ताहिक मार्मीक व्यंगचित्रांसाठी प्रसिद्ध असून जगभरात त्यांचे अनेक वाचक आहेत.त्यांच्या काही व्यंगचित्रांवरून वाददेखील होत असतात.प्रेषित पैंगबंरांच त्यांनी केलेल व्यंगचित्र टिकेच कारण बनल होत.यानंतर शार्ली हेब्दोच्या फ्रान्समधील कार्यालयावर हल्ला झाला होता.परंतु शार्ली हेब्दो नेहमीच तात्कालिक घटनांवर भाष्य करणार व्यंगचित्र देत असतात.

असच एक ब्रिटीश राजघराण्याशी संबंधित असणार त्यांच एक व्यंगचित्र गाजत असून या व्यंगचित्राची दखल जगभरात घेतली जात आहे.या व्यंगचित्रात ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ (द्वितीय) या त्यांची द्वितीय नातसून प्रिन्स हॅरी यांची पत्नी मेगन मार्केल यांच्या मानेवर गुडघा ठेवून उभ्या असल्याच दिसून येत आहे.विशेष म्हणजे हे व्यंगचित्र साप्ताहिकाच्या कव्हर पेजवर छापले आहे.

हे चित्र म्हणजे सध्या ब्रिटीश राजघराण्यात चाललेल्या संघर्षाच्या आगीत तेल ओतण्याचा प्रकार आहे.ब्रिटीश राज घराण्यातील प्रिन्स हॅरीच्या पत्नी मेगन या अमेरिकन मॉडल, अॅक्टर आहेत.त्यांची आई कृष्णवर्णीय तसेच वडील गौरवर्णीय होते.परिणामी मेगन या द्विवंशीय आहेत.नेमका काय वाद सुरू आहे ब्रिटीश राजघराण्यात आणि शार्ली हेब्दोने का छापल अस व्यंगचित्र?

वाचा सविस्तर…

प्रसिद्ध अमेरिकन मुलाखतकार आॅपरा विन्फ्रेला मेगन मार्केल आणि तिचे पती प्रिन्स हॅरी यांनी दिलेल्या मुलाखतीत ब्रिटीश राजघराण्यावर वर्ण द्वेषाचा आरोप केला आहे.मेगन मुलाखतीत म्हणाल्या आपण द्विवंशीय असल्याने आपल्या होणारया बाळाच्या रंगाविषयी राजघराण्याला चिंता होती व तो कृष्ण वर्णीय झाल्यास त्याला राजघराण्याचा वारस न करण्याची तजविज सुरू होती.जगभरात या प्रकरणावरून ब्रिटीश राजघराण्यावर टीका चालली असून वर्ण द्वेषाच हे प्रकरण घृणास्पद असल्याच अनेकांच मत आहे.मेगन व हॅरी सध्या ब्रिटीश राजघराण्यात राहत नसून ते अमेरिकेत वास्तव्यास आहेत.परंतु काय आहे व्यंगचित्राचा अर्थ?

मेगन मार्केल यांनी बकिंगहॅम पॅलेस का सोडल? या स्लोगनखाली हे व्यंगचित्र छापण्यात आले आहे.मेगन यांच्या मानेवर राणींनी गुडघा ठेवल्याच व्यंगचित्रात दिसण्याच कारण म्हणजे मेगन यांनी बकिंगहॅम पॅलेसमध्ये आपल्याला गुदमरल्यासारख वाटत अस सांगितल आहे.जॉर्ज फ्लॉईड या कृष्ण वर्णीय निशस्त्र युवकाचा अमेरिकन पोलिसांनी अमेरिकेतच मानेवर गुडघा दाबून गुदमरून मारल्याची घटना ताजी असताना या प्रकरणान आगीत तेल ओतण्याच काम केल आहे.मेगन व हॅरी यांनी ब्रिटीश राजघराण्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले असून तेथे आपल्याला स्पेस मिळत नसल्याच सांगितल आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.