भांडूपमधील ड्रीम मॉल्समधील कोवीड सेंटरला आग!

0

राज्यात सध्या कोरोनाचा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोनाचा दुसरा स्ट्रेंथ आला असल्याने मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दुसरी लाट शंभर दिवस राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.राज्यात कोवीड प्रतिबंधात्मक लसीचा वेग वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.राज्यात बरेच जिल्ह्यात लॉकडाऊनही करण्यात आला आहे. तसेच मागील वर्षी बंद करण्यात आलेली कोविड सेंटर पुन्हा चालू करण्यात आली आहेत.

 

मुंबई कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असतानाच भांडूपमधील ड्रीम मॉल्समधील पहिल्या मजल्यावर असणालेल्या सनराईज हॉस्पिटलमध्ये आग लागण्याची घटना काल रात्री 12.30 च्या सुमारास घडली.

याबाबत पोलिस उपायुक्त प्रशांत कदम म्हणाले की, रात्री 12.30 च्या सुमारास ड्रीम मॉल्समधील पहिल्या मजल्यावर आग लागली असून ही आग लेवल 3ते4 ची आहे. परिणामी आगीच्या ज्वाळा भडकल्या त्यामुळे 23 अग्निशमन दलाचे बंब आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

तातडीने रेस्क्यू आॅपरेशन करत 76 जणांना कोविड सेंटरला हलवण्यात आले आहे.रात्री उशिरा लागलेल्या या आगीत लोकांत भीतीच वातावरण होत.

 

आगीची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकरांनी घटनास्थळी धाव घेतली.यावेळी पेडणेकर म्हणाल्या “मी पहिल्यांदाच एखाद्या मॉलमध्ये हॉस्पिटल पाहत आहे, या प्रकरणी नक्कीच कडक कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.