बोंबला! असं काय झालं की समुद्रातही झाले ट्रॅफिक जॅम…

0

काहिरा : १९३.३ किलोमीटर लांब सुएज कालवा भूमध्य समु्द्र आणि लाल समुद्राला जोडतो. या कालव्यातून रोज हजारोंच्या संख्येने लहान-मोठी जहाजं युरोप ते आशिया आणि आशिया ते युरोप असा प्रवास करतात. मात्र, मंगळवारी सकाळी, स्थानिक वेळेनुसार ७.४० वा. सुएज पोर्टच्या उत्तरेला कालवा पार करताना, कंट्रोल सुटल्याने एक कंटेनर जहाज ‘एवरग्रीन’ (४०० मीटर लांब, ५९ मीटर रूंद) फसलं असल्याची बातमी आहे.

दरम्यान, हे जहाज काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात टग बोट्स (जहाजांना धक्का देणाऱ्या बोट्स) तैनात केल्या आहेत. तरी हे जहाज तिथून काढण्यासाठी काही दिवस लागू शकतात. हे जहाज मधेच अडकल्याने भूमध्य समु्द्र आणि लाल समुद्राच्या किनाऱ्यांवर मोठ्या संख्येने जहाजांचा जाम लागला आहे आणि जर हा रस्ता जास्त वेळ बंद राहिला तर समुद्री जहाजांना पूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून युरोपमध्ये जावे लागणार आहे.

पनामाचं हे जहाज चीनमधून माल घेतल्यानंतर नेदरलॅंड पोर्ट रॉटरडॅमसाठी जात होतं. यादरम्यान त्याने हिंद महासागरातून युरोप जाण्यासाठी सुएज कालव्याचा मार्ग निवडला. तेव्हाच हे जहाज इथे अडकलं.

हे जहाज २०१८ मध्ये तयार करण्यात आले होते. तैवानची ट्रान्सपोर्ट कंपनी एव्हरग्रीन मरीन या जहाजाला संचलित करत असल्याची माहिती समोर आली आहे.

रिपोर्टनुसार, ‘एवरग्रीन’च्या चालक दलाने सांगितलं आहे की, सुएज कालवा पार करताना आलेल्या वेगवान वाऱ्यामुळे जहाज पूर्णपणे फिरलं. नंतर जेव्हा त्याला सरळ करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते कालव्यात आडवं अडकलं. त्यामुळे पूर्ण ट्रॅफिक बंद झालं. या जहाजाच्या मागे आणखी एक मालवाहक जहाज ‘द मेर्सक डेनवर’ फसलेलं आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.