
अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या बीड जिल्हा बँकेचे निकाल जाहीर, वाचा कोणाचा विजय अन कोणाला धक्का!
बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना जबर धक्का बसला असून महाविकास आघाडीच्या अमोल आंधळे यांचा या निवडणुकीत विजय झाला आहे. तर पंकजा मुंडे पुरस्कृत धनराज मुंडे यांचा पराभव झाला आहे.
२० मार्चला पार पडलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. या निवडणुकीत अमोल आंधळे यांचा तब्बल २२३ मतांनी विजय झाला आहे. भाऊसाहेब नाटकर यांना ४० मते तर एका अपक्ष उमेदवाराला ९२ मते मिळाली आहे. तर भाजपाच्या धनराज मुंडे यांना फक्त ९ मतं मिळाली आहे. बदमराव पंडित यांना फक्त २ मते मिळाली आहेत.
बँकेतील पंकजा मुंडे यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावायला धनंजय मुंडे यांना यश मिळाले आहे.
महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे सहा उमेदवार बीड जिल्हा बँकेची निवडणूक लढवत आहेत. २० मार्च रोजी निवडणूक होऊ घातली आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व संचालक उमेदवारांची बैठक घेतली होती. महाविकास आघाडीमार्फत शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढत असलेल्या उमेदवारांचा परिचय आघाडीतील सर्व तालुक्यातील प्रमुखांशी करून देण्यात आला. बीडमधील राष्ट्रवादी भवन येथे ही बैठक पार पडली.