फ्लॅटमध्ये राहणारया वृध्द दांपत्याचा मृत्यू ,दुर्गंधी आल्यावर शेजाऱ्यांना खबर.मुलगी आहे अमेरिकेत स्थायिक

0

एकत्र कुटुंबांची आपली परंपरा लोप पावत असतानाच लहान होणारी कुटुंब, कमी झालेला नातेवाईकांचा राबता यामुळे माणस आत्मकेंद्री झालेली आहेत.पूर्वी शेजारी म्हणजे नातलगांच्या वर असत, एकमेकांना परस्पर आदान प्रदान होत असे सुखदुख वाटली जात असत परंतु फ्लॅट संस्कृतीत दार बंद केली की, आत्मकेंद्री जगण सुरू होत आहे.

 

याचाच एक अत्यंत विदारक नमुना औरंगाबाद येथील बन्सीलालनगरमध्ये दिसून आला.विजय माधव मेहेंदळे वय 70 आणि सौ.माधुरी विजय मेहेंदळे बन्सीलालनगरमधील अजिंक्य फिलोसिया अपार्टमेंटमधील फ्लॅट क्र.403मध्ये राहत होते.विजय मेहेंदळे वाल्मीममध्ये नोकरीला होते, सेवानिवृत्तीनंतर ते शहरातच स्थायिक झाले.दांपत्याला एकच मुलगी होती जिच लग्न अमेरिकेत झाल्यावर ती तेथेच स्थायिक झाली.मेहेंदळे यांचे काही नातेवाईक शहरातच राहतात परंतु त्यांचा फारसा घरोबा नसल्याने येण जाण नव्हत.

विजय मेहेंदळे यांना सोरायसीस तर त्यांच्या पत्नीला पॅरालिसीस असे आजार होते. परिणामी हे वृध्द आजारी दांपत्य घरातच राहत असे.कामाव्यतिरिक्त फारसे घराबाहेर पडत नसत तसेच त्यांच्याकडे फारस कोणाच येण जाण नव्हत.परिणामी त्यांच्या घराचा दरवाजा सतत बंद असे.शेजारी पण फारसे त्यांच्या घरात डोकावत नसत.एकूणच हे दांपत्य अलिप्तपणे वागत असे.कोणाशीच फारसा संपर्क नसल्याने एखाद दिवस बाहेर न आल्यास त्याची चौकशी अथवा चर्चा होत नव्हती.

 

गेले दहा ते बारा दिवस हे दांपत्य घराबाहेर पडलेले नव्हते.घराचा दरवाजा सतत बंद होता, परंतु शेजारीही फारसे लक्ष देत नव्हते कदाचित विश्रांती घेत असतील या समजाने सर्वांनी दुर्लक्ष केले. अशातच अचानक दुर्गंधी सुरू झाली शोध घेतला असता मेहेंदळे यांच्या सदनिकेतून ती येत असल्याचे लक्षात आले.एका स्थानिक सामाजिक कार्यकर्त्याने ही बातमी पोलिसांना कळवली.घटनास्थळी पोलिस येताच दार आतून बंद असल्याचे निदर्शनास आले,शेवटी पोलिसांनी छतावर चढून किचनच्या गॅलरीतून आत प्रवेश केला असता घटनास्थळी दांपत्याचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडले.पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणी पाठवला तसेच त्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार केले. पुढील तपास सुरू आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.