पुण्यातील लोकडाऊनवर अजित दादांनी घेतला हा निर्णय!

0

पुणे : पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत पुण्यात लॉकडाऊन करावा की नाही? यावर चर्चा करण्यात आली. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात लॉकडाऊन न करता निर्बंध लादण्यात येतील, असे जाहीर केले आहे.

 

पुणे व पिंपरी चिंचवडमधील कोरोना उद्रेकाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व पालिका आयुक्तांसमवेत बैठक घेतली. यावेळी लॉकडाऊन न करता, कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला. पुण्यात ६२ कंटेन्मेंट झोनमध्ये अत्यंत कडक निर्बंध लावले जाणार आहेत. पुण्यातील सर्व शाळा महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत. हॉटेल व मॉलला रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अजित पवार यांनी प्रशासनाला टेस्टिंग वाढविण्याचा व लसीकरण मोहिमेला गती देण्याच्या देखील सूचना या बैठकीत केल्या आहेत. पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून सलग दोन दिवस या आकड्याने हजाराचा टप्पा ओलांडल्याने सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येते आहे.

दरम्यान भाजपाचे कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील अजित पवार यांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये लॉकडाऊन व कोरोना परिस्थितीवर चर्चा झाल्याची चर्चा आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.