
पुढच्या ८ दिवसात परीक्षा घेऊ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विद्यार्थ्यांना आश्वासन!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परंतु पुढील काही दिवसांत ही परीक्षा होणार असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिले आहे.
लवकरच नवीन तारीख घोषित करण्यात येणार आहे. परीक्षार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षा देताना पाणी देणारा, सुपव्हिजन करणारा कर्मचारी हा कोरोना बाधित तर नाही ना अशा दडपणाखाली विद्यार्थी नसायला पाहिजे यासाठी सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. कोरोना चाचणी केलेला कर्मचारी आणि कोरोना लस घेतलेलाच कर्मचारी परीक्षा घेण्यास उपस्थित राहील अशी सुचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी MPSC (राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२०) पुढे ढकलण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रक प्रशासनाने जारी केले होते. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकल्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन केले. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी येत्या ८ दिवसांत एमपीएससीची परीक्षा घेण्यात येईल असे वचन दिले आहे.
परीक्षा पुढे ढकलण्यात आली नाही या परीक्षेचे उद्या शुक्रवारी मुख्य सचिव सीताराम कुंटे वेळापत्रक जाहीर करतील त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी करु नये कोणत्याही परीस्थितीत विद्यार्थ्यांची वयोमर्यादेची अडचण उद्भवणार नाही. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्यात येईल. तसेच परीक्षेसाठी उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे