परमवीर सिंहांनी बकासुरासारखी संपत्ती हडपली,रुपाली चाकणकरांचा घणाघात

0

मुंबई पोलिस अधिकारी परमवीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपानंतर महाराष्ट्राच राजकारण तापल असून राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी ट्विट करत परमवीर सिंह यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.विरोधी पक्षाची चाकरी करत परमवीर सिंहांनी बकासुरासारखी संपत्ती हडपली असून महाराष्ट्राला बदनाम करण्याच षडयंत्र रचले आहे.रुपाली चाकणकरांचा यांनी आपल्या ट्विटमध्ये परमवीर सिंह यांच्या संपत्तीचा लेखाजोखा मांडला असून संपत्तीचा हा आकडा थक्क करणारा आहे.

 

#ParmbirExposed या हॅशटॅग खाली केलेल्या एका ट्विटमध्ये रुपाली चाकणकरांनी परमवीर सिंह यांच्या संपत्तीचा लेखाजोखा मांडला आहे,

परमवीर सिंह यांच्या संपत्तीचा आढावा घेताना त्या म्हणतात, मुंबईत परमवीर सिंह यांचे दोन कोटी किंमतीचे दोन फ्लॅट तर हरियाणातील त्यांच्या गावी चार कोटी रुपये किंमतीचे घर आहे. परमवीर सिंह यांच्या पत्नीच्या नावे मुंबईत आणि हरियाणातही कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे.

 


वरील संपत्तीच स्पष्टीकरण रुपाली चाकणकर यांनी दिल असून त्यात त्या म्हणतात, 2003 साली अंधेरीतील वसुंधरा सोसायटीत परमवीर सिंह यांनी 48.75 लाखांचा फ्लॅट घेतला तर 4 च वर्षांत 2007 साली नेरळमधील शगुफा सोसायटीत 3.60 कोटी रुपयांचा एक फ्लॅट खरेदी केला.इतकच नाहीतर 2019 साली हरियाणातही 14 लाख किंमतीची जमीन खरेदी केली आहे.परमवीर सिंह यांच हरियाणातही घर असून त्याची किंमत 4कोटी रुपये आहे.परमवीर सिंह यांनी अमाप संपत्ती हडपली असल्याचे यावरुन लक्षात येते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.