परमबीर यांचे पत्र बनावट असण्याची शक्यता! फोटोवर क्ली क करून सविस्तर वाचा

0

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राने खळबळ उडाली असून त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर फार गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेगळा खुलासा करण्यात आला असून हे पत्र बनावट असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या पत्राच्या विश्वासहर्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून या पत्रावर परमबीर सिंग यांची कुठेही सही स्पष्ट दिसत नसल्याचे म्हटले आहे.

गृहरक्षक दलाचे कमांडर परमबीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री निवासात आलेला मेल हा बनावट ही असू शकतो, असा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. शनिवारी दुपारी ४ वाजून ३७ मिनिटांनी पत्र प्राप्त झाले आहे. [email protected] या ई-मेल पत्त्यावरून परमबीर सिंह असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ई-मेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे परमबीर सिंह यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे सीएमओकडून सांगण्यात आले. तसेच परमबीर सिंह यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ई-मेल पत्ता [email protected] असा आहे. यामुळे प्राप्त झालेला ई मेल खरा आहे की नाही याची शाहनिशा करण्यात येते आहे.

 

दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणात स्पष्टीकरण देत परमबीर सिंग यांनी केलेले आरोप खोटे असून हा त्यांना फसवण्याचा व महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा डाव असल्याचे म्हटले आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.