पंकजा मुंडेंच्या कारखान्यात थकले कर्मचाऱ्यांचे वेतन

0

एकेकाळी आशिया खंडात नावाजला गेलेला परळी वैद्यनाथ साखर कारखाना मागच्या काही वर्षांपासून व्यवस्थापनातील काही दोष, कायम पडणारा दुष्काळ या कारणांमुळे अडचणीत आला आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासाठी अनेक दिवस आंदोलन केले होते, आता कर्मचाऱ्यांचे १९ महिन्यांचे वेतन थकलेले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी दहा दिवसांपूर्वी कारखान्याचे कार्यकारी संचालकास निवेदन देत पगार द्या अन्यथा आम्ही कारखाना बंद करू, असा इशारा दिला होता. दहा दिवस उलटूनही पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळपासूनच कारखाना बंद केला. वजनकाटा व सर्व कार्यालयांचे कर्मचारी, उत्पादन युनिटचे कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.

 

हा नुकताच सुरू करण्यात आला होता पण कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्याने त्यांनी संप पुकारला आहे. या कारखान्यावर तब्बल ७०० कर्मचारी काम करत असून त्यांनी बंद पुकारल्यामुळे अधिकारी व कर्मचारी वर्गात तुंबळ वाद झाला होता.

भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याकडे या कारखान्याचे अध्यक्षपद असून त्यांच्या नाकाखाली हा सर्वप्रकार घडला आहे, या प्रकारामुळे सर्वत्र नाराजी व्यक्त करण्यात येते आहे. तब्बल १९ महिने पगार न मिळाल्याने कर्मचारी वर्ग देखील हवालदिल झाला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कारखान्याच्या व्यवस्थापनावर कठोर शब्दात टीका केली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.